टू व्हीलर सेक्टरच्या स्कूटर सेगमेंटमध्ये १२५ सीसी स्कूटरची मोठी रेंज आहे जी त्यांच्या मायलेज, स्टाइल आणि शक्तिशाली इंजिनसाठी पसंत केली जाते.

तुम्हालाही अशीच १२५ सीसी स्कूटर खरेदी करायची असेल, तर या सेगमेंटमधील टॉप ३ स्कूटर्सचे संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या जे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात.

Viral Video Family modified Kitchen In a small space in a car vehicle carries Utensils And Groceries For Picnic
VIDEO: सहलीला बनवू शकता घरच्यासारखं जेवण; पाहा चालत्या फिरत्या गाडीतलं ‘हे’ अनोखं स्वयंपाकघर
a bride made Mehndi QR Code on the hand to get wedding gift video goes viral shared by Google
लग्नाचा आहेर घेण्यासाठी नवरीचा जुगाड! मेहंदीने हातावर कोरला QR Code, गुगलने शेअर केला व्हिडीओ
Bharat Electronics Limited Trainee Engineer 517 vacancies Last Day 13 March
BEL Trainee Bharti 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनिअरच्या ५१७ पदांसाठी भरती! ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
how to Make green chili pickle
घरच्या घरी झटपट बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं! जेवणाबरोबर तोंडी लावा, नोट करा सोपी रेसिपी

इथे नमूद केलेल्या टॉप ३ स्कूटर्समध्ये, आम्ही या तीन स्कूटरच्या किंमतीपासून ते फिचर्सपर्यंत आणि इंजिनपासून स्पेसिफिकेशनपर्यंत प्रत्येक छोट्यातली छोटी डिटेल्स सांगणार आहोत.

Yamaha Fascino 125: Yamaha Fascino 125 ही या सेगमेंटमधील सर्वाधिक मायलेज देणारी स्कूटर आहे, जी कंपनीने पाच व्हेरिएंटसह बाजारात लॉन्च केली आहे.

स्कूटरच्या इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास, यात १२५ cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे ८.२ PS ची पॉवर आणि १०.३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायरसह मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिला आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर ६८.७५ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. Yamaha Fascino ची सुरुवातीची किंमत ७३,७०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी त्याच्या टॉप व्हेरिएंटवर ८२,३३० रुपयांपर्यंत जाते.

TVS Jupiter: टीव्हीएस ज्युपिटर ही या यादीतील दुसरी सर्वाधिक मायलेज देणारी स्कूटर आहे, जी कंपनीने चार व्हेरिएंटसह बाजारात लॉन्च केली आहे.

बाईकमध्ये सिंगल-सिलेंडर १२४.८ सीसी इंजिन आहे जे ८.१५ पीएस पॉवर आणि १०.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

आणखी वाचा : OLA S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लवकरच मिळणार नेव्हिगेशन आणि क्रूझ कंट्रोल फीचर, जाणून घ्या

स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक लावले आहेत ज्यात अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही TVS ज्युपिटर १२५ स्कूटर ६४ kmpl चा मायलेज देते जी ARAI द्वारे प्रमाणित आहे. TVS ज्युपिटरची सुरुवातीची किंमत ७५,६२५ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरिएंटवर ८२, ५७५ रुपयांपर्यंत जाते.

Suzuki Access 125: Suzuki Access 125 ही त्याच्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे, जी कंपनीने हाय-टेक फिचर्ससह पाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. स्कूटरमध्ये १२४ cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे ८.७ PS पॉवर आणि १० Nm पीक टॉर्क जनरेट करते.

स्कूटरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर ५७.२२ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. Suzuki Access १२५ ची सुरुवातीची किंमत ७५,६०० रुपये आहे, जी त्याच्या टॉप व्हेरिएंटवर जाताना ८४,८०० रुपयांपर्यंत जाते.