Best Selling SUVs in October 2023: देशात मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री होत चालली आहे. सणासुदीचा काळ असल्याने बाजारपेठेत कार्सची मागणी प्रचंड वाढली आहे. यातच कारच्या कंपन्यांमध्येही मोठी स्पर्धा वाढलेली दिसून येत आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये मारुती ब्रेझा ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही होती. पण, ऑक्टोबरमध्ये नेक्सानने गेम बदलला आणि नंबर-१ बनली आहे.
टाटाने नुकतीच 2023 Tata Nexon Facelift भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. ज्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबरमध्ये टाटा नेक्सॉनच्या एकूण १६,८८७ युनिट्सची विक्री झाली. यासह ती देशातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली. अशा स्थितीत मारुती सुझुकी ब्रेझा दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. एकूण १६,०५० युनिट्सची विक्री झाली आहे.
(हे ही वाचा : देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर MPV कार मिळतेय आणखी स्वस्तात, मोठ्या कुटुंबासाठी परफेक्ट, ११ रंगात बाजारात उपलब्ध )
यात १०.२५ इंचांचे टच स्क्रीन इंफोटेनमेन्ट सिस्टिम, इलेक्ट्रिक सनरूफ, नवे एपी पॅनल, अॅप्पल कार प्लेसह अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी फीचर्सचा समावेश आहे. टाटाच्या नव्या कारच्या टर्बो-पेट्रोल इंजिनमध्ये ५-स्पीड एमटी, ६-स्पीड एमटी, ६-स्पीड एएमटी आणि ७-स्पीड डीसीएचा पर्याय आहे, तर टर्बो-डिझेल इंजिनमध्ये ६-स्पीड एमटी आणि ६-स्पीड एएमटीचा पर्याय आहे. त्याचे डिझेल इंजिन २४kmpl मायलेज देऊ शकते आणि पेट्रोल इंजिन १७.५kmpl मायलेज देऊ शकते.
टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारी Nexon कार अपडेटेड व्हर्जनसह भारतीय ऑटो बाजारात दाखल केली गेली आहे. टाटाच्या या नव्या कारची किंमत ८.१० लाख रुपये असल्याची माहिती आहे. भारतीय बाजारात या कारची तुफान मागणी आहे.