Top 5 Selling Bikes in India: भारतीय दुचाकी बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. विशेषत: मोटारसायकलींची चांगली विक्री होत आहे. मात्र, जुलैमध्ये काही दुचाकी उत्पादकांच्या विक्रीत घट झाली आहे तर काहींच्या विक्रीतही वाढ झाली आहे. तर, हिरो मोटोकॉर्पने सर्वाधिक दुचाकी विकल्या आहेत. त्याची बाईक सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. चला, जुलै २०२३ मध्ये विक्रीच्या बाबतीत कोणत्या बाईकनं मारली बाजी पाहूया.

‘या’ बाईक्सना मिळतेय भारतीयांची पसंती

या वर्षी जुलैमध्ये Hero MotoCorp च्या विक्रीत १३.८ टक्के (वार्षिक आधारावर) घसरण झाली असली तरीही कंपनीने चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. त्याची स्प्लेंडर देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींच्या चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. हिरोने जुलैमध्ये २,३८,३४० युनिट्सची विक्री केली आहे, जी जुलै २०२२ मधील विक्रीपेक्षा कमी आहे.

(हे ही वाचा : Hero Lectro ला ही विसरुन जाल, टाटाची स्वस्त इलेक्ट्रिक सायकल देशात आलीये; २.५० रुपयात धावणार ३५ किमी)

यानंतर Honda Shine दुसऱ्या क्रमांकावर होती, जिने जुलै २०२३ मध्ये १,३१,९२० युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी, याच महिन्यात (जुलै २०२२) जपानी बाईक निर्मात्याने १,१४,६६३ शाइनची विक्री केली होती. म्हणजेच, त्याची विक्री १५ टक्क्यांनी वाढली आहे.

त्याच वेळी, बजाजने जुलैमध्ये पल्सरच्या १,०७,२०८ युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी जुलैमध्ये १,०१,९०५ युनिट्सची होती. त्याची विक्री वार्षिक आधारावर ५.२ टक्क्यांने वाढली आहे. त्यानंतर हिरोची एचएफ डिलक्स आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Hero HF Deluxe च्या विक्रीत वर्षभरात ८.४ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली परंतु पुन्हा ८९,२७५ युनिट्सची विक्री झाली, ज्यामुळे ती चौथी सर्वाधिक विकली जाणारी बाईक बनली. जुलै २०२२ मध्ये ९७,४५१ युनिट्सची विक्री झाली. हिरो पॅशन ४७,५५४ युनिट्स विकून पाचव्या क्रमांकावर आहे.