Toyota removed suv urban cruiser : दमदार लूक आणि फीचर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या टोयोटाने SUV URBAN CRUISER या वाहनाला आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून हटवले आहे. त्यामुळे, या वाहनाची विक्री बंद झाली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीने या वाहनावर सूट देखील दिली होती. तरी देखील तिची विक्री वाढली नव्हती. दरम्यान या वाहनाची विक्री बंद झाल्याबाबत टोयोटाने स्पष्टीकरण दिलेले नाही.
२०२० साली ही एसयूव्ही भारतात लाँच झाली होती. ही कार ९.०३ लाख रुपयांमध्ये (एक्स शोरूम) उपलब्ध होती. परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध असतानाही ही एसयूव्ही भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरली. ऑक्टोबर महिन्यात या कारच्या एकही युनिटची विक्री झाली नाही. कदाचित त्यामुळे कंपनीने तिला संकेतस्थळावरून हटवले असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तर कंपनी या एसयूव्हीचे अद्ययावत व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत असल्याची देखील शक्यता व्यक्त होत आहे.
(४ रुपयांत करा १०० किमीचा प्रवास, घेऊन ‘या’ ही स्वस्त ई सायकल)
SUV URBAN CRUISER ही मारुतीच्या ब्रेझाला आव्हान देत होती. ही कार नव्या पिढीच्या मारुती ब्रेझा या वाहनावर आधारीत होती. मात्र, ती धमाल कामगिरी करू शकली नाही. अर्बन क्रुझर एसयूव्ही आणि ग्लान्झा ही टोयोटाची दोन्ही वाहने मारुतीच्या वाहनांवर आधारित आहेत. हा मारुती आणि टोयोटा या दोन्ही कार निर्मिती कंपन्यांमधील एका कराराचा भाग आहे. ग्लान्झा ही टोयोटाच्या बलेनो व्हर्जनवर आधारित आहे.
अर्बन क्रुजर आधुनिक लिथियम आयन बॅटरी आणि १.५ लिटर ४ सिलेंडर पेट्रोल इंजिनसह मिळत असे. हे इंजिन मागिल पिढीच्या विटारा ब्रेझामध्ये होते. इंजिन १०३ एचपीची ताकत आणि १३८ एनएमचा पिक टॉर्क निर्माण करत असे. अर्बन क्रुजर विटारा ब्रेझा व्यतिरिक्त टाटा नेक्सॉन, ह्युंडाई व्हेन्यू, महिंद्रा एक्सयूव्ही ३०० या वाहनांना आव्हान देत होती