TVS iQube vs Bajaj Chetak : पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे आणि पर्यावरणाविषयी जागरूकता वाढल्याने लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहेत. सध्या देशात अनेक स्टार्टअप कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉंच केल्या आहेत. परंतु असं असूनही, बाजारपेठेतील मोठ्या भागावर अजूनही बजाज आणि टीव्हीएसच्या इलेक्ट्रिक स्कूटरचं वर्चस्व आहे. कारण या दोन्ही कंपन्या अतिशय विश्वासार्ह आहेत. तुम्हालाही या दोन इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक खरेदी करायची असेल, तर या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरचे डिटेल्स इथे आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

TVS iQube vs Bajaj Chetak ची रेंज

TVS iQube ची रेंज 75Km आहे, TVS iQube ४.२ सेकंदात ० ते ४० kmph ची स्पीड वाढवू शकते. स्कूटरचा टॉप स्पीड ७८ किमी प्रतितास आहे. चार्ज करण्यासाठी ५ तास लागतात.Bajaj Chetak एका चार्जमध्ये ९० किमी पर्यंत चालवता येते. दुसरीकडे, Bajaj Chetak इको मोडमध्ये ६० किमी प्रतितास वेगाने धावते. चार्ज करण्यासाठी ५ तास लागतात.

आणखी वाचा : फक्त १.५ ते २ लाखांच्या बजेटमध्ये मिळतेय Maruti WagonR, जाणून घ्या ऑफर

TVS iQube vs बजाज चेतकचे फिचर्स

या स्कूटरमध्ये अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. जिओ-फेन्सिंग आणि जिओ टॅगिंग सारखी फिचर्स दोन्ही स्कूटरमध्ये उपलब्ध आहेत. iQube वरील हेडलॅम्प पुढील ऍप्रनमध्ये स्थित आहे आणि LED दिवसा चालणारे दिवे मिळतात.Bajaj Chetak इलेक्ट्रिक रेट्रो स्टाइलिंगसह येते. यात गोल हेडलॅम्प आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स मिळतात, जे क्रोम बेझल्ससह येतात.

TVS iQube vs Bajaj Chetak टायर्स आणि ब्रेक्स

TVS iQube ला ९०/९०-१२ फ्रंट आणि ९०/९०-१२ मागील टायर मिळतात. यात ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हील सारखी फिचर्स देखील आहेत.Bajaj Chetak ला ९०/९०-१२ फ्रंट आणि ९०/१००-१२ मागील ट्यूबलेस टायर मिळतात. याला अलॉय व्हील्स मिळतात.

आणखी वाचा : Royal Enfield Classic 350 : ही क्रूझर बाईक ७२ हजार ते १ लाखांपर्यंत मिळत आहे, जाणून घ्या ऑफर

TVS iQube Vs Bajaj Chetak किंमत

TVS iQube स्कूटर एकाच प्रकारात येते. त्याची एक्स-शोरूम किंमत १.१५ लाख रुपये आहे.Bajaj Chetak दोन प्रकारात येते. त्याची शहरी किंमत १ लाख रुपये आहे आणि प्रीमियम व्हेरिएंटची किंमत १.१५ लाख रुपये आहे.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tvs iqube vs bajaj chetak which is better in both electric scooters know feature specifications and price prp
First published on: 03-02-2022 at 21:02 IST