TVS ने लॉन्च केली अपाचे RTR 200 4V; किंमत १.३३ लाखापासून सुरू

टीव्हीएसने भारतीय बाजारपेठेत अपडेटेड 2022 Apache RTR 200 4V मॉडेल लॉन्च केले आहे.

TVS ने लॉन्च केली अपाचे RTR 200 4V; किंमत १.३३ लाखापासून सुरू (Photo- TVS Website)

टीव्हीएसने भारतीय बाजारपेठेत अपडेटेड 2022 Apache RTR 200 4V मॉडेल लॉन्च केले आहे. ही बाईक सिंगल चॅनल एबीएस आणि ड्युअल चॅनल एबीएस या दोन प्रकारांमध्ये आणली आहे. याची किंमत अनुक्रमे १,३३,८४० रुपये आणि १,३८,८९० रुपये इतकी आहे. नवीन TVS Apache RTR 200 4V हे सध्याच्या मॉडेलसारखे दिसते. मात्र हेडलाइट्समध्ये थोडेसे बदल केले गेले आहेत. तसेच डीआरएल (डेटाइम रनिंग लॅम्प) सह नवीन हेडलॅम्प डिझाइन मिळाले आहे. ही बाईक या वर्षी लॉन्च झालेल्या Apache RTR 160 4V ची आठवण करून देते. एकूण स्टाइलिंग आणि इंजिन वैशिष्ट्ये पूर्वीप्रमाणेच आहेत. बाईक तीन रंगांच्या पर्यायांमध्ये देण्यात आली आहे. ग्लॉस ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि मॅट ब्लू या रंगात उपलब्ध आहे. यात सर्व डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.

मोटरसायकलला पॉवरिंग १९७.७५ सीसी सिंगल-सिलेंडर, चार-स्ट्रोक, 4 व्हॉल्व्ह, ऑइल-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन ९,००० आरपीएमवर २०.८२ पीएस पॉवर आणि ७,८०० आरपीएमवर १७.२५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक दिले असून ग्राहक सिंगल/ड्युअल-चॅनल एबीएस प्रकार निवडू शकतात.

Maruti Suzuki: तुमच्या कारमध्ये काही समस्या असेल तर लगेच संपर्क साधा; ‘या’ गाड्यांसाठी विशेष सर्व्हिस मोहीम

स्पोर्ट्स, अर्बन आणि रेन या तीन राइड मोडसह मोटरसायकलला अ‍ॅडजस्टेबल सस्पेंशन सेटअप दिला आहे. विशेष बाब म्हणजे युजर्स बाइकचे सस्पेन्शन वेगवेगळ्या राइडिंग कंडिशननुसार समायोजित करू शकतात. हे TVS SmartXonnect ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येते. रेसिंग स्टाईल रिव्ह्यूसाठी रेस विश्लेषणासह डेटा उपलब्ध करण्यात आला आहे. यात एडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लीव्हर्स आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tvs launch 2022 apache rtr 200 4v model rmt