दुचाकीतील स्कूटर सेगमेंटमध्ये स्टाइलिश आणि स्पोर्टी डिझाइन असलेल्या स्कूटर्सना सर्वाधिक मागणी आहे. जर तुम्ही नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर या स्कूटरच्या दोन लोकप्रिय स्कूटर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळेल. आज याची तुलना करण्यासाठी आमच्याकडे TVS Ntorq 125 आणि Honda Grazia स्कूटर आहेत जी स्टाइल आणि वैशिष्ट्यांमध्ये जास्त मायलेजसह येतात, त्यामुळे तुम्ही योग्य स्कूटरची निवड करू शकता.

TVS Ntorq 125: टीव्हीएस एनटॉर्क ही एक वेगवान स्कूटर आहे जी त्याच्या स्पोर्टी डिझाइनसाठी पसंत केली जाते. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात १२४.८ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे १०२ पीएस पॉवर आणि १०.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्याच्या पुढच्या चाकात डिस्क ब्रेक आणि मागील चाकात ड्रम ब्रेक दिला आहे. स्कूटरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, गाडी ५६.२३ किमीचा मायलेज देते मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. टिव्हीएस एनटॉर्कची सुरुवातीची किंमत ७५,४४५ रुपये आहे. टॉप व्हेरिएंटवर ८७,५५० रुपयांपर्यंत जाते.

Kawasaki Z650 RS 50th Anniversary Edition भारतात लाँच; किंमत आणि फिचर्स जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Honda Grazia: होंडा ग्राझिया ही कंपनीची प्रीमियम स्कूटर असून स्टाइल आणि मायलेजसाठी पसंत केली जाते. या स्कूटरच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात १२४ सीसी सिंगल सिलेंडर असून ८.२५ पीएस पॉवर आणि १०.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करतो. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिला आहे.मायलेजबाबत होंडाचा दावा आहे की, ही स्कूटर ४९ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि या मायलेज ARAI प्रमाणित केला आहे. होंडा ग्राझियाच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची सुरुवातीची किंमत ७८,३८९ रुपये असून टॉप व्हेरिएंटमध्ये ८७,६६८ रुपयांवर जाते.