देशात आलयं 'हे' भन्नाट डिव्हाइस, आता हेल्मेटशिवाय तुम्ही गाडी चालवू शकणार नाहीत | Twowheeler will not be able to drive without wearing a helmet, the startup of Indore prepared this unique device in just 12 days | Loksatta

देशात आलयं ‘हे’ भन्नाट डिव्हाइस, आता हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी चालवता येणार नाही!

टू व्हीलर चालवितांना आता हेल्मेट घालणे बंधनकारक होणार

Two Wheeler helmet
आता हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी चालवता येणार नाही (Photo-financialexpress)

सध्या रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन हेल्मेट सुरक्षेसाठी अनेक वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जातात, मात्र लोकं त्यांची अंमलबजावणी करत नाही आणि त्यामुळेच अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हेच लक्षात घेऊन ‘इंदूर’च्या एका स्टार्टअपने असे उपकरण बनवले आहे की, ते ‘टू व्हीलर’मध्ये बसवल्यानंतर जर कोणी हेल्मेटशिवाय ते सुरू केले तर ते वाहन सुरू होणार नाही, म्हणजेच तो हेल्मेटशिवाय गाडी चालवू शकत नाही.

हे उपरण केवळ १२ दिवसांत तयार केले गेले. यासोबतच या उपकरणाच्या निर्मात्यांनी पंतप्रधान मोदींना याबाबत मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले आहे. रिपोर्ट्सनुसार, हे सिक्युरिटीलेस डिव्हाईस ३१ जानेवारीला लॉन्च करण्यात आले आहे. या डिव्हाईसची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे उपकरण बसवल्यावर जर शीख वाहन चालक दुचाकीवर बसला तर वाहन सुरू करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. हेल्मेटशिवाय कॅमेरा त्यांच्यावर नजर ठेवेल आणि कार सुरू होईल.

(हे ही वाचा : तुमची इलेक्ट्रिक कार जास्त रेंज देत नाही का? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा, वाहन पळेल सुसाट)

हे उपकरण कसे काम करणार?

  • हे उपकरण भारतात प्रथमच बनवले गेले आहे.
  • डिव्हाइसचा आकार ३*१.५ सेमी आहे.
  • हे उपकरण स्पीड मीटरजवळ कोणत्याही दुचाकीमध्ये ते मॅन्युअली बसवता येते.
  • त्याला जोडलेला कॅमेरा स्पीड मीटरजवळ बसवला आहे जो सतत त्यावर लक्ष ठेवतो.
  • त्यानंतर वाहनाचा चालक आपल्या सीटवर बसतो आणि त्याने हेल्मेट घातले नसल्यास वाहनाचे इंजिन सुरू होत नाही.
  • चालकाने हेल्मेट घातले असेल तर गाडी सुरू होते.
  • जर चालकाने हेल्मेट घातले नसेल आणि त्याच्या मागे असलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले असेल तर वाहन सुरू होणार नाही.
  • हे डिव्हाइस पूर्णपणे वाटरप्रूफ आहे.

उपकरणाची किंमत

भारतातील सर्व दुचाकी वाहनांना याबद्दल माहिती देणारा मेल पाठवण्यात आला आहे. यासोबतच पैटर्न मिळाल्यानंतर सर्वसामान्यांना ते दुचाकीमध्ये बसवता येणार आहे. त्याची किंमत फक्त १५,००० ते २,००० च्या दरम्यान असेल. विशेष म्हणजे, चांगल्या हेल्मेटची किंमत ₹ १००० ते २००० पर्यंत असते, त्यामुळे हे उपकरण चालकांसाठी देखील खूप फायदेशीर आणि सुरक्षित असल्याचे सिद्ध होईल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 11:48 IST
Next Story
Mahindra Electric Cars: महिंद्राच्या ‘या’ नवीन इलेक्ट्रिक कार भारतात येणार, पाहून तुम्हालाही लागेल वेड