Volton launches booty cycles : इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक ई वाहनांकडे वळत आहेत. ही गरज पाहून अनेक वाहन निर्मिती कंपन्या भारतीय बाजारपेठेत आपली ई वाहने सादर करत आहेत. स्कुटरच्या बाबतीत ओला आणि कारच्या बाबतीत टाटा आघाडीवर आहे. दरम्यान दिल्लीतील वोल्टॉनने एक भन्नाट इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. ही सायकल एका रुपयात २५ किमीची रेंज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

रेंज आणि किंमत

बुटी १२०, बुटी ६० आणि बुटी ३० अशा तीन व्हेरिएंटमध्ये ही सायकल उपलब्ध आहे. बुटी १२० ची किंमत ४५ हजार रुपये असून ती ३६ एएच बॅटरी पॅकसह मिळते. ही सायकल थ्रोटल मोडमध्ये ९० ते १०० किमी आणि पेडल असिस्टवर १३० ते १५० किमीची स्पीड देते.

(ओप्पोचा स्वस्त 5G फोन झाला लाँच; ८ तास गेमिंग, ५० एमपी कॅमेरासह मिळत आहेत भन्नाट फीचर्स)

बुटी ६० व्हेरिएंटची किंमत ३७ हजार असून ती २४ एएच बॅटरी पॅकचा वापर करते. थ्रोटल मोडमध्ये या सायकलची रेंज ५५ ते ६० आणि पेडल असिस्टवर ७५ ते ८० किमीची रेंज मिळते. तेच बुटी ३० व्हेरिएंटची किंमत ३० हजार रुपये आहे. ही ई सायकल १२ एएच बॅटरी पॅकचा वापर करते. थ्रोटल मोडमध्ये सायकल २५ ते ३० किमीची रेंज देते, तर पेडल असिस्टवर ४५ ते ५० किमीची रेंज मिळते.

सायकलवर दोन व्यक्ती बसू शकतात किंवा ती डिलिव्हरीसाठी वापरता येऊ शकते. ही सायकल लोडर म्हणून देखील वापरता येऊ शकते. सायकल एका रुपयात २५ किमीचा मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तिन्ही सायकलींची सर्वोच्च गती २५ किमी प्रति तास आहे. चार्ज होण्यासाठी या तिन्ही सायकली ३.५ तासांचा वेळ घेतात.

(मेटा आज सकाळी कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढेल; ‘या’ पार्श्वभूमीवर निर्णय)

बुटी १२० व्यतिरिक्त इतर दोन सायकलींमधून बॅटरी काढता येते, ज्याने चार्जिंग करणे सोयीचे ठरते. सायकलींना जास्तीत जास्त १४१ किलोंचा भार सहन करण्यासाठी डिजाईन करण्यात आले आहे. तिन्ही सायकलींमध्ये मडगार्डसह २०x3 इंच फॅट टायर्स देण्यात आले आहेत.