Rolls Royce Car:  रोल्स रॉयस गाड्या रस्त्यावर क्वचितच दिसतात.आणि खरे सांगायचे तर आपल्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांनी आजपर्यंत रोल्स रॉयस कार देखील पाहिली नाही. बहुतेक लोकांनी रोल्स रॉयसचे शोरूमही पाहिलेले नाही. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई सारख्या सामान्य कार कंपन्यांचे शोरूम कोणत्याही शहरात दिसतात पण रोल्स रॉयसचे शोरूम कुठेच दिसत नाही, त्यामुळे अनेकांना शंकाही येते की, रोल्स रॉयसचे शोरूम आहेतही की नाही. Rolls Royce कोणत्याही सामान्य व्यक्तीला त्याच्या शोरूमला भेट देण्याची परवानगी देते का? अशा अनेक शंका लोकांच्या मनात आहेत आणि आज आम्ही तुमच्या या सर्व शंकांचे निरसन करणार आहोत.

सर्वप्रथम, जाणून घ्या की, Rolls-Royce चे शोरूम आहेत आणि कंपनीच्या वेबसाइटनुसार, Rolls-Royce शोरूम दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद सारख्या शहरांमध्ये आहेत. आता दुसऱ्या शंकेबद्दल जाणून घ्या का, रोल्स रॉयसच्या शोरूमला सामान्य माणूसही भेट देऊ शकतो काय?

(हे ही वाचा: मुकेश अंबानींची ‘ही’ नवी कार पहिल्यांदाच दिसली रस्त्यावर, पाहताच मुंबईकर म्हणाले, “किंमत तर…”)

रोल्स रॉयसच्या शोरूममध्ये सामान्य माणूसही जाऊ शकतो का?

याचे उत्तर Quora वर आशिष बच्चेच नावाच्या युजरने दिले आहे. मुंबईतील रोल्स रॉयस शोरूममध्ये गेल्याचे त्याने लिहिले आहे. यासाठी त्याने आगाऊ अपॉइंटमेंटही बुक केली नव्हती. शोरूमच्या लोकांनीही आनंदाने त्यांना गाड्या दाखवल्या. त्यांनी पुढे लिहिले आहे की, Rolls-Royce कार घेण्याचा काही नियम आहे का? मला याचे उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता होती आणि म्हणूनच मी तिथे गेलो, असल्याचे त्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोल्स रॉयस पार्श्वभूमी तपासणीसह तुम्ही ऐकलेल्या सर्व अफवा खोट्या आहेत. हे लिहून आशिष बच्चे यांनी रोल्स रॉईसच्या शोरूममध्ये सर्वसामान्यांनाही जाता येईल, अशी माहिती सर्वांना देण्याचे काम केले आहे. दुसरीकडे, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही रोल्स रॉयस कार खरेदी करू शकता. पण फक्त करोडपतीच रोल्स रॉयस कार खरेदी करू शकतात. Rolls Royce Wraith ही कंपनीची भारतातील सर्वात स्वस्त कार आहे परंतु तिची किंमत ६.२२ कोटी रुपये आहे.