Why motorcycle and scooter headlights are always ON?: भारत जगातील सर्वात मोठ्या दुचाकी बाजारपेठांपैकी एक आहे. मोठी लोकसंख्या दुचाकीने प्रवास करते. आपल्या देशात बहुतेक लोकांकडे वैयक्तिक वाहन म्हणून दुचाकी आहेत.देशात बाईकची मागणी वाढली असून याच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तुम्ही रस्त्यावरून जात असाल आणि समोरून येणाऱ्या बाईकचे हेडलाइट तुम्हाला दिवसाही सुरू दिसले असेलच, पण बाईकचे हेडलाइट्स रात्री सोबतच दिवसाही का सुरु असतात, याचा कधी तुम्ही विचार केलाय का, चला तर आज आपण हेडलाईट्स दिवसाही सुरुच का असतात जाणून घेऊया…
शोरूममध्ये नव्याने दाखल झालेल्या दुचाकी, चारचाकी गाड्यांना ऑटोमॅटिक हेडलाइट सिस्टीम (एएमओ) ही नवीन यंत्रणा आली आहे. यामुळे गाडी चालू केली, की गाड्यांच्या हेडलाइट आपोआपच सुरू राहणार आहेत. अपघात नियंत्रणासाठी केंद्र सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आला. १ एप्रिलपासून प्रदूषणमुक्तीसाठी बीएस-४ या नवीन इंजिनप्रणालीचा सर्वच वाहनांमध्ये समावेश करण्यात आलं आहे.आता बाईक आणि स्कूटरची हेडलाईट नेहमी चालू असते आणि हँडलवरील स्विच बंद करण्याचा स्वीचही काढून टाकण्यात आला आहे.
(हे ही वाचा: तुमच्या बाईकमध्ये ‘किकस्टार्ट’ सिस्टम का येत नाहीये माहितेय कां? ‘हे’ आहे यामागील खरं कारण )
हेडलाइट्स नेहमी चालू ठेवण्याचे फायदे काय?
देशभरात आणि विशेषतः शहरांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढते आहे. अपघाताची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ‘ऑटोमॅटिक हेडलाइट ऑन’ (AHO) वैशिष्ट्य सुरू करण्याची शिफारस केली होती. नेहमी चालू असलेल्या हेडलाइटचा मुख्य उद्देश रस्त्यांवरील दुचाकींची दृश्यमानता वाढवणे हा होता. वास्तविक, अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये वाहनांची दृश्यमानता वाढवण्यासाठी हा नियम अनेक वर्षांपासून लागू आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने रस्ते अपघातात मोठी घट झाली आहे.
हेडलाइट्स ऑन फीचर आणण्यामागचं कारण काय?
भारतातही टू व्हीलरमध्ये ऑटोमॅटिक हेडलाइट ऑन फीचर आणण्यामागचे हे मुख्य कारण आहे. वास्तविक, रस्त्यावर लहान वाहनांची दृश्यमानता कमी आहे. अशा स्थितीत दूरवरून वाहन येत असेल तर त्याचा पत्ता लागत नाही. त्याचबरोबर खराब हवामान किंवा रस्त्यावर धुके असल्याने छोटी वाहने अजिबात दिसत नाहीत. अशा स्थितीत वाहनांची धडक बसण्याची शक्यता वाढते. मात्र, जर बाईकची हेडलाईट नेहमी चालू असेल तर तिची दृश्यमानता कायम राहते आणि ती दूरवरूनही दिसू शकते.
(हे ही वाचा: प्रत्येक ट्रकच्या मागे ‘Horn OK Please’ का लिहिलेलं असतं माहितेय का? यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क )
बॅटरीचे नुकसान काय होते?
बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की, AHO असलेली बाईक जास्त बॅटरी वापरते कारण हेडलाइट नेहमी चालू असते. यामुळे बॅटरी लवकर खराब होऊ लागते आणि ती पुन्हा पुन्हा बदलावी लागते. तथापि, AHO सह बाईकवर सतत हेडलाइट्स चालू ठेवल्याने बॅटरीवर परिणाम होत नाही, असे तज्ञांचे मत आहे.
आजकालच्या नवीन बाइक्समध्ये अॅडव्हान्स बॅटरी टेक्नॉलॉजी आणि पर्याय वापरले जात आहेत, त्यामुळे लोड वाढल्यावरही बॅटरीवर परिणाम होत नाही. दुसरीकडे, AHO प्रणाली बाईकच्या मायलेजवर परिणाम करत नाही. आता अनेक बाइक्स LED DRL सह येऊ लागल्या आहेत ज्यात नेहमी चालू असलेल्या हेडलाइटच्या जागी नेहमी ऑन LED लाईट वापरण्यात आली आहे. ते हेडलाइट्सपेक्षा कमी उर्जा वापरतात आणि दुरून पाहता येतात.