यामाहा मोटरच्या मोबिलिटी प्लॅटफॉर्म मोटो बिझनेस सर्व्हिस इंडिया (MBSI) ने वाहन सेवा फर्म Malbork Technologies सह भागीदारीत इलेक्ट्रिक फोर व्हीलर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीने घोषित केले की मालबोर्कसह इलेक्ट्रिक वाहन विभागामध्ये ऑपरेशन सुरू करण्यासाठी कंपनी खूप उत्साहित आहे. MBSI देशातील मोबिलिटी क्षेत्रात कार्यरत टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सना सेवा प्रदान करते.

बंगळुर स्थित Malbork Technologies ही बंगळुरूमध्येच अॅप-आधारित टॅक्सी एग्रीगेटर सेवा देखील देते. एमबीएसआईचे व्यवस्थापकीय संचालक शोजी शिरायशी म्हणाले, “भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झपाट्याने वाढत आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक आता पारंपरिक वाहनांकडे पाठ फिरवत आहेत. या महत्त्वाच्या आशादायक बाजारपेठेत तेजीची अनेक चिन्हे आहेत. गेल्या काही महिन्यांतील एमबीएसआयची ही दुसरी संघटना आहे. गेल्या महिन्यात, बाइक भाड्याने देणारी कंपनी रॉयल ब्रदर्ससोबत भागीदारीही जाहीर केली.

Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल
Samsung launch of A Series Galaxy A55 5G and Galaxy A35 5G with awesome innovations With Offers
यूट्यूब प्रीमियम अन् आकर्षक ऑफर्ससह ‘या’ कंपनीच्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये एंट्री; जाणून घ्या किंमत

माल्बोर्क टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि सीईओ संजीव कुमार म्हणाले, “आम्ही रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवत आहोत आणि देशातील इतर अनेक शहरांमध्येही आमची उपस्थिती वाढवण्याचा आमचा मानस आहे. “

आणखी वाचा : Komaki Electric या दिवशी नवीन हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार

यामाहा आतापर्यंत टू-व्हीलर सेगमेंटमध्‍ये केवळ पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करते. यामाहा मोटर्सकडे सध्या फक्त इलेक्ट्रिक वाहनांमध्ये स्कूटर आहेत. कंपनी आगामी काळात आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची फ्लॅगशिप वाढवणार आहे.

यासोबतच जर कंपनीने इलेक्ट्रिक फोर-व्हीलरच्या सेगमेंटमध्ये प्रवेश केला तर टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाई सारख्या कंपन्यांना यामाहाची टक्कर मिळू शकते. Tata, Mahindra आणि Hyundai ने भारतीय ग्राहकांनुसार त्यांच्या इलेक्ट्रिक कारची किंमत ठरवली आहे. अशा परिस्थितीत यामाहा दीर्घकाळापासून भारतात व्यवसाय करत आहे आणि कंपनीला भारतीयांच्या आवडी-निवडी या दोन्ही गोष्टींची चांगलीच जाणीव आहे.