मी आहे एक बहुवार्षिक वनस्पती
मला येतात तीन प्रकारची फुलं
नाक्यानाक्यावर सापडेल तुम्हाला
माझ्या झुडुपांच्या सजावटीची झुलं
हसतमुख मी, जांभळा, पांढरा रंग
मधुमेह, कॅन्सरवर उपयोग करून घेण्याचा
मानवाने बांधला चंग
सदाफुली

एक वेल डौलदार वाढते
तसतशी तिची कळी फुलते
कळीचे फूल आणि फुलाचे फळ
ओलेच सुकवतात, पण औषधी बक्कळ
विडय़ाचे पान, मसाले भात, बिर्याणी
मला आहे मसाल्यात मान
वेलदोडा

बागेतून कोवळी पाने खुडतात,
मग ती कोमेजवतात.
त्यांना देवून चक्क पीळ
बारीक कापून सुकवतात.
पानात याच्या सातशे रसायन
रोज पिण्याचा शोधला जातो प्रकार नवा
वर्तमानपत्र वाचताना मात्र हा
घोटभर तरी हवाच हवा
चहा