साहित्य : नारळाची करवंटी, जुने प्लॅस्टिकचे मोठे रिळ, पतंगाचा कागद, अ‍ॅक्रिलिक रंग, ब्रश, कात्री, गम, स्केचपेन, लेस, पाने (सजावटीसाठी) इ.
कृती : जुन्या रिळाला पतंगाच्या कागदात गुंडाळून चिकटवा. वर व खाली लावलेल्या  जास्तीच्या कागदाला आतील बाजूस ढकला. त्यावर स्केचपेनने सोपे नक्षीकाम करून सजवा. करवंटीला अ‍ॅक्रिलिक रंगात आतून व बाहेरून रंगवून घ्या व पूर्णपणे कडक उन्हात वाळवा. शक्यतो गडद रंगात रंगवा. रंगीत करवंटीच्या खडबडीत कडांना सुंदर सोनेरी लेस चिकटवा. खोलगट भागावर बाहेरील बाजूने साजावटीसाठीची पाने गोलाकारात चिकटवा. करवंटी व गुंडाळलेले सुशोभित रिळ एकमेकांना चिकटवा व पुन्हा उन्हात वाळू द्या. वरील खोलगट करवंटीमध्ये टी कॅन्डल्स लावून वापरू शकता. किंवा छोटय़ा वस्तू ठेवायलासुद्धा हा स्टँड उपयोगी पडतो.