साहित्य : ४-६ इंच पातळ पुठ्ठय़ाचा (पोस्टकार्ड, वहीचं मागचं-पुढचं कव्हर, एखाद्या खोक्याचा पुठ्ठा) आयताकृती तुकडा, रंगीत टिश्यू पेपरचे (घोटीव कागद, चंदेरी कागद, हाताने रंगविलेला साधा रायटिंग पेपर,    प्रेझेंट पेपर)  ४ इंचाचे १२ चौरस आणि ६ इंचाचा एक चौरस, कात्री (नागमोडी कडा असलेली कात्री- पिंकिंग शिअर्स असली तर काम सोपं होईल), चिकटपट्टी किंवा ग्ल्यू स्टिक.
कृती : पुठ्ठय़ावर चारी बाजूंनी एक सेंटीमीटर अंतर सोडून रेघा मारा. रेघांच्या आतला सगळा पुठ्ठा कापा. लांब बाजू एकमेकांवर चिकटवा. याचा दंडगोल तयार होईल. टिश्यू पेपरचा चौरस त्रिकोणाचा आकार होईल अशा प्रकारे दुमडा. बंद बाजू हातात धरून उरलेल्या दोन्ही बाजूंच्या कडा नागमोडी कापा. घडी उघडली की नागमोडी कडा असलेला चौरस तयार झालेला दिसेल. चौरसाची दोन समोरासमोरची टोकं एकमेकांना चिकटवा. एक पाकळी तयार होईल. अशा सर्व (१०- १२) पाकळ्या तयार करा. पुठ्ठय़ाच्या सिलेंडरला खालच्या आणि वरच्या कडांना प्रत्येक पाकळीचे खालचे आणि वरचे टोक चिकटवा. झिरमिळ्या करायला ६़ ६ च्या पेपरच्या तुकडय़ाची एक बाजू पाकळ्या लावलेल्या दंडगोलावर चिकटवा आणि कागद सारख्या अंतरावर कापून झिरमिळ्या तयार करा. हा कंदील तुमच्या आवडीप्रमाणे सजवा.
कंदिलाच्या वरच्या बाजूला जाड सुईने समोरासमोर दोन भोकं पाडून दोरा किंवा पातळ तारेच्या साहाय्याने कंदील टांगण्यासाठी तयार करा. अशा प्रकारे छोटे छोटे कंदील तयार करून दारावर त्याची तोरणांसारखी माळ लावता येईल.
शशिकला लेले naupada@yahoo.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य : जुनी सीडी, लेस, जुन्या रिफिल्स, जुन्या सेलोटेपची रिकामी रिंग, थर्माकोलचे बॉल्स, रंगीत कागदाच्या पट्टय़ा, कात्री, गम इ.
कृती : जुन्या सीडीच्या खराब झालेल्या बाजूवर रिकामी सेलोटेपची रिंग चिकटवून घ्या. या सेलोटेपच्या कडांना साधारण सारख्या अंतरावर जुने रिफिल्स चिकटवून जोडा. रिफिलच्या टोकावर कागदाच्या पट्टय़ांचे कोन बनवून त्यात गम घालून चिकटवा. टोकं झाकण्यासाठी थर्माकोलचे गोळे लावा. वरील बाजूस मजबुती देण्यासाठी लेस गुंडाळा व लटकन असलेल्या लेसने सुशोभित करा. सीडीच्या दर्शनी भागाच्या बाहेरील कडेला थर्माकोलचे गोळे लावून सुशोभित करा. सीडीच्या मध्यातून वायर सोडा व खालील बाजूने होल्डर लावा  (अर्थात, हे काम मोठय़ांच्या मदतीनं करा.) आणि लाइट लावून बघा- कंदील किती सुंदर दिसतो ते!

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmafil art corner sky lantern
First published on: 19-10-2014 at 12:53 IST