जुन्या राख्या, रिबीन्समधील एखादा छानसा गुळगुळीत चेहरा वेगळा काढा. किंवा तुम्ही तयार करा. पत्रिका किंवा कार्डातून जाळीदार जाड कागद आयताकृती पट्टीच्या आकारात कापा. जोडाजोड करावी लागल्यास रिबीन किंवा लेसने जोडावर सुशोभन करा. चेहऱ्याचा वेगळा काढलेला आकार या आयताकृती पट्टीच्या एका निमुळत्या टोकावर चिकटवा. त्याच्यामागे युक्लिप किंवा शर्टक्लिप सेलोटेपने उलटय़ा बाजूस चिकटवा. सॅटिन रिबीन किंवा लेसचा लूप बनवून मागे चिकटवा. कार्डपेपरच्या निमुळत्या पट्टीवर जागा असल्यास एखादा वाचनीय संदेश लिहा. आपला रिसायकल बुकमार्क तयार झालाय.