या वर्षी ऑगस्ट महिन्यात ब्राझील देशातील रिओ दी जानेरो या शहरामध्ये ३१ वी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा झाली. सहभागी झालेल्या प्रत्येक देशाने सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या सिंधू आणि साक्षी मलिक यांनी आपल्या कामगिरीने भारताची मान ताठ ठेवली. तर दीपा कर्माकरचे जिम्नॅस्टिकमधील पदक थोडक्यात हुकले; हे तर तुम्हाला माहीतच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरातील अनेक देशांपैकी (ia) या इंग्रजी अक्षरांनी शेवट होणाऱ्या – म्हणजे देवनागरीत (या) या अक्षराने संपणाऱ्या देशांची नावे ओळखण्याचे हे कोडे आहे. उदाहरणार्थ- (India  – इंडिया) हे ओळखण्यासाठी रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये संबंधित देशाने केलेली कामगिरी सूचक माहिती म्हणून देण्यात आलेली आहे.

  • जलतरणात अमेरिकेच्या एकूण ३३ पदकांच्या खालोखाल या देशाने एकूण १० पदके मिळवली आहेत.
  • महिलांच्या ट्रिपल जंपमध्ये सुवर्णपदक मिळवणारी कॅटरिन द. अमेरिका खंडातील या देशाची.
  • पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये रौप्य आणि महिलांच्या मॅरेथॉनमध्ये ब्राँझ पदक पटकावणारा आफ्रिकेतील देश.
  • या देशाच्या बॅडमिंटनपटूंनी मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक पटकावले. शिवाय वेटलिफ्टर्सनी दोन रौप्य पदकेही कमावली.
  • भारताच्या सिंधूला बॅडमिंटनमध्ये एक रौप्य पदक मिळाले, तर या देशाच्या बॅडमिंटनपटूंनी तीन रौप्य पदके पटकावली.
  • कुस्ती (Wrestling) मध्ये सर्वाधिक म्हणजे ९ पदके मिळवणारा देश. या देशाची एकूण पदक संख्या : ५६.
  • बास्केटबॉलमध्ये या देशाच्या पुरुष संघाला रौप्य आणि महिला संघाला ब्राँझ पदक मिळाले. या खेळातील दोन्ही सुवर्णपदके अमेरिकेला मिळाली.
  • या देशाच्या महिलांनी थाळीफेक आणि भालाफेक या खेळात सुवर्णपदके पटकावली आहेत.
  • पुरुषांच्या ५० किमी चालण्याच्या शर्यतीचे सुवर्णपदक या देशाने पटकावले.
  • टेनिसमधील पुरुष दुहेरीचे रौप्य पदक मिळवणारा देश. १९७६ साली जिम्नॅस्टिक्समध्ये १० पैकी १० गुण अनेकदा मिळवणारी नादिया याच देशाची.

 

ज्योत्स्ना सुतवणी

jyotsna.sutavani@gmail.com

 

उत्तरे :

  1. r) Australia- ऑस्ट्रेलिया
  2. s) Colombia- कोलंबिया
  3. t) Ethiopia- इथिओपिया
  4. u) Indonesia- इंडोनेशिया
  5. v) Malaysia- मलेशिया
  6. w) Russia- रशिया
  7. x) Serbia- सर्बिया
  8. y) Croatia- क्रोएशिया

z)Slovakia- स्लोव्हाकिया

  1. rq) Romania- रूमानिया
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta puzzle
First published on: 13-11-2016 at 01:00 IST