News Flash

दि. १५ ते २१ डिसेंबर २०१७

घरामध्ये मौजमजेचा माहोल असेल.

मेष हातातोंडाशी आलेली, पण काही कारणाने लांबलेली कामे आता मार्गी लावण्याचा तुम्ही निश्चय कराल. व्यापार-उद्योगात सरकारी नियम आणि कायदेकानू यामध्ये अडकलेल्या प्रश्नांमध्ये लक्ष घालाल. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी केलेले काम पुन्हा एकदा तुम्हाला करावं लागेल. वरिष्ठांच्या सूचना नीट पाळल्यात तर कामाचा वेग व दर्जा उत्तम राहील. घरामध्ये मौजमजेचा माहोल असेल. येणाऱ्या-जाणाऱ्यांची बडदास्त तुम्हाला ठेवावी लागेल.

वृषभ नित्यक्रमामध्ये खूप तणाव असेल. त्याला विसरून जाण्यासाठी आता एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम आखाल. व्यवसाय-उद्योगात सरकारी कामे आणि कोर्ट व्यवहार याकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्याला प्राधान्य द्या. ज्यांना तुम्ही पसे देण्याचे कबूल केले होते, त्यासाठी तरतूद करून ठेवा. नोकरीमध्ये सत्तेपुढे शहाणपण नसते हे विसरून चालणार नाही. वरिष्ठांची आज्ञा पाळा. घरामध्ये एखादा छान समारंभ ठरेल. त्यानिमित्ताने पाहुणे मंडळी जमा होतील. अशा वेळी मानापमानाचे प्रसंग टाळा. स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

मिथुन नित्यकर्माचा तुम्हाला मनस्वी कंटाळा आला असेल. ज्या कामाच्या तुम्ही मागे लागला आहात ते काम अडून राहिल्याने तुमचे मन बंड करून उठेल. थोडेसे बिनधास्त राहून जीवनाचा आनंद लुटावासा वाटेल. व्यवसाय-उद्योगात अनोळखी व्यक्तीवर एकदम विश्वास टाकू नका. नोकरीच्या ठिकाणी दिलेला शब्द सहकाऱ्यांनी न पाळल्यामुळे तुमची धावपळ उडेल. बेकार व्यक्तींना विलंब सहन करावा लागेल. घरामध्ये जोडीदाराच्या प्रगतीविषयी किंवा मन:स्वास्थ्याविषयी काळजी वाटेल.

कर्क सतत कामामध्ये गर्क राहणारी तुमची रास आहे. पण या आठवडय़ात ज्या गोष्टी तुम्ही मनाशी आखलेल्या होत्या त्या गोष्टीत अडथळे आल्याने तुम्हाला एक प्रकारची सुस्ती येईल. प्रकृतीच्या तक्रारीमुळे तुमचे मन कामात लागणार नाही. व्यापार-उद्योगात कोणतेही नवीन बेत करण्यापूर्वी स्पर्धकांच्या गोटात काय चालले आहे याचा अंदाज घ्या. पशाची थोडी तंगी जाणवेल. नोकरीमध्ये  कामात चूक होणार नाही, याकडे लक्ष द्या.  घरामध्ये ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे असा अनुभव येईल.

सिंह इकडे आड तिकडे विहीर अशी तुमची स्थिती होणार आहे. घरातील काम करायला गेल्यावर करिअरकडे दुर्लक्ष; याउलट करिअरकडे लक्ष दिले तर घरातील व्यक्तींच्या तक्रारी ऐकायला लागतील. हे सर्व टाळण्यासाठी कामाचे योग्य नियोजन करा. व्यापार-उद्योगात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारपेठेतील चढउतारांकडे लक्ष ठेवा. नोकरीमध्ये वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य माना. घरामधल्या वडिलधाऱ्या व्यक्तींच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या.

कन्या रोजच्या धावपळीचा तुम्हाला मनस्वी कंटाळा आल्यामुळे तुम्ही आता थोडासा आराम करायचे ठरवाल. परंतु आयत्या वेळी घरामधली कामे उपटल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये जखडून गेल्यासारखे वाटेल. व्यापार-उद्योगात जनसंपर्कावर अवलंबून असलेली कामे मार्गी लावण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न कराल. त्यामध्ये थोडेफार यश दिसायला सुरुवात होईल. नोकरीमध्ये सत्तेपुढे शहाणपण नसते हे लक्षात ठेवा. तुमचे भविष्यातील बेत गुप्त ठेवा. घरामध्ये एखादी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल. ती टाळता येणार नाही.

तूळ तुमचे करिअर आणि तुमचे घर या दोन्ही आघाडय़ांवर तुम्हाला सतर्क राहावे लागेल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश ठेवण्यासाठी एखादी स्पेशल ऑफर द्याल. सरकारी कामे आणि कोर्ट व्यवहार यामध्ये जातीने लक्ष घालाल. नोकरीमध्ये कामाचा जरी ताणतणाव असला तरी तुम्ही काही हलकेफुलके क्षण अनुभवाल. घरामध्ये छान कार्यक्रम ठरवाल. हे कदाचित मोठय़ा व्यक्तींना आवडणार नाही. लग्नसराई, वास्तुशांत अशा कामांना तुमची हजेरी लागेल.

वृश्चिक या दुनियेत तुमच्या खिशात पसे खुळखुळत असतील तर सर्वजण तुमची खुशामत करायला तयार असतात, नाहीतर याच व्यक्तींना तुम्ही नको असता, असा अनुभव येण्याची शक्यता आहे. तुम्ही सर्वाशी आपुलकीने वागणे चांगले. व्यापार-उद्योगात प्रॉपर्टीसंबंधी काही जुने वाद असतील तर ते पुन्हा एकदा उफाळून येतील. मन शांत ठेवलेत तर त्यावर काहीतरी मार्ग निघू शकेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांविषयी तुमचे मत व्यक्त करू नका. घरामध्ये बुजुर्ग व्यक्तींच्या स्वास्थ्याची काळजी घ्या.

धनू स्वत:चे मन रमवण्याकरिता तुम्ही अनेक कार्यक्रम ठरवाल. त्याकरिता मोठय़ा व्यक्तींची परवानगी मिळणे कठीण आहे. व्यापार-उद्योगात स्वत:चा मोठेपणा मिरविण्यासाठी एखादा कार्यक्रम हातात घ्याल. नोकरीमध्ये तुमचा उत्साह ओसंडून वाहत असेल. सत्तेपुढे शहाणपण नसते याचा विसर पडू देऊ नका. घरामध्ये एखादे शुभकार्य ठरेल/पार पडेल. त्यामध्ये देण्याघेण्यावरून रागलोभाचे प्रसंग उद्भवतील. प्रकृतीकडे लक्ष द्या.

मकर निरभ्र आकाशात एकदम ढग आल्यानंतर जशी परिस्थिती निर्माण होते तशी परिस्थिती निर्माण होईल. तुम्हाला मौजमजा करावीशी वाटेल. पण अचानक एखादे तातडीचे काम निघाल्याने तुमचे कार्यक्रम बदलावे लागतील. व्यापार-उद्योगात बहुतांशी गिऱ्हाईक चौकशा करणारे असतील. त्यामुळे कमाई कमी वाटेल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामाचा आज प्रत्यक्षात काहीही उपयोग नाही असे काम करावे लागेल. घरामध्ये सर्वाची मोट बांधणे कठीण होईल. शेवटी तुम्ही तुमच्या पद्धतीने काम कराल.

कुंभ सबसे बडा रुपैया हे जरी खरे असले तर काही वेळेला हितसंबंधांना जास्त महत्त्व असते. या आठवडय़ामध्ये सभोवतालच्या व्यक्तींशी प्रेमाने वागा. व्यापार-उद्योगात एखादे अवघड काम जुन्या ओळखींमुळे मार्गी लागेल. नवीन प्रोजेक्टसंबंधी योग्य व्यक्तींशी बोलणी होतील. नोकरीमध्ये ज्या प्रश्नामध्ये गुंतागुंत झाली होती त्यामध्ये एखादा चांगला मार्ग निघेल. वरिष्ठांच्या सूचनांकडे नीट लक्ष द्या. घरामध्ये जुनी प्रॉपर्टी, वाटण्या अशा प्रश्नांवर वादविवाद होण्याची शक्यता आहे.

मीन जी कामे तांत्रिक कारणांमुळे लांबलेली होती ती मार्गी लागतील.  व्यापार-उद्योगात नवीन वर्षांकरिता  नवीन करार होण्याची शक्यता आहे.  आत्मविश्वास वाढल्यामुळे कामाला चांगली गती येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी एखादे आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण होईल. काही जणांना बढतीची कुणकुण लागेल. कुटुंबीयांना देशात/परदेशात प्रवासाला जाण्याचे योग संभवतात. घरामध्ये एखादा आनंददायी कार्यक्रम साजरा होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 1:01 am

Web Title: astrology 15 to 21 december 2017
Next Stories
1 दि. ८ ते १४ डिसेंबर २०१७
2 दि. १ ते ७ डिसेंबर २०१७
3 दि. २४ ते ३० नोव्हेंबर २०१७
Just Now!
X