News Flash

भविष्य : दि. ५ ते ११ ऑक्टोबर २०१८

नोकरीमध्ये ज्या व्यक्तींवर अवलंबून असाल त्यांची काहीतरी अडचण निघाल्यामुळे तुमचा खोळंबा होईल.

(संग्रहित छायाचित्र)

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मेष :एखादी अव्यवहारी कल्पना या आठवडय़ामध्ये तुमचे लक्ष वेधेल.  व्यापार-उद्योगात जास्त फायदा मिळविण्याकरिता जास्त गुंतवणूक करावी लागेल. संभाव्य धोके नीट लक्षात घ्या. नोकरीमध्ये ज्या व्यक्तींवर अवलंबून असाल त्यांची काहीतरी अडचण निघाल्यामुळे तुमचा खोळंबा होईल. या आठवडय़ात गुरू राशीबदल करून अष्टमस्थानात प्रवेश करेल. घरातील प्रश्न सोडविण्याकरिता वेळ आणि पैसे हातात राखून ठेवा.

वृषभ : सर्व ग्रहमान तुमच्या शांत स्वभावाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे तुमची परीक्षा होईल. व्यापारात तुमचे बेत गुप्त ठेवा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामात तत्पर राहा. घरामधला एखादा वाद संपुष्टात येण्याची लक्षणे दिसू लागतील. या आठवडय़ात गुरू राशीबदल करून सप्तमस्थानात प्रवेश करेल. तिथे तो एक वर्षांहून अधिक काळ राहील. या दरम्यान तुमचे अनेक प्रश्न हलके होतील. घरामध्ये लांबलेले कार्य निश्चित होईल.

मिथुन : व्यापार-उद्योगात अपेक्षित पैसे सप्ताहाच्या मध्यात मिळतील. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाचे काम इतरांवर न सोपवता स्वत: पूर्ण करा. घरामध्ये सर्वाचे समाधान करणे कठीण होईल. या आठवडय़ात गुरू राशीबदल करून षष्ठस्थानात प्रवेश करणार आहे. तेथे तो एक वर्षांहून अधिक काळ राहील. या दरम्यान तुमच्या क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होईल. प्रकृतीच्या काही तक्रारी असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कर्क : व्यापार-उद्योगात काही निर्णय तुम्हाला अचानक बदलावे लागतील.  नोकरीच्या ठिकाणी एखादी चूक होण्याची शक्यता आहे. या आठवडय़ात गुरू राशीबदल करून पंचमस्थानात प्रवेश करेल. तेथे त्यांचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक काळ असेल. या कालावधीत प्रगतीच्या दृष्टीने काही चांगले बदल होतील. मात्र त्यामध्ये बरेच कष्ट पडतील. चालू नोकरीत मोठय़ा प्रकल्पाकरिता तुमची निवड होईल.

सिंह : व्यापार-उद्योगात कमी श्रमांत जास्त पैसे मिळविण्याचा तुमचा इरादा असेल. नोकरीच्या ठिकाणी  वरिष्ठांचे मूड सांभाळणे अवघड जाईल. या आठवडय़ात गुरू राशीबदल करून चतुर्थस्थामध्ये प्रवेश करणार आहे. तेथे त्याचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक काळ असेल. हा कालावधी व्यक्तिगत जीवनामध्ये सुख आणि समृद्धी वाढविणारा ठरेल. जुनी किंवा वडिलोपार्जति प्रॉपर्टी विकून त्याऐवजी जे आहे त्यात समाधान मानणे याकडे कल राहील.

कन्या : विविध प्रकारची कामे तुम्ही हाताळू शकाल. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुम्ही कराल त्यातून तुमची कल्पकता दिसून येईल. घरामधल्या व्यक्तींना तुमचा आधार वाटेल. गुरू राशीबदल करून तृतीयस्थानात प्रवेश करेल. तेथे त्यांचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक काळ असेल. हा कालावधी प्रगतीकारक ठरेल. व्यापार-उद्योगात विस्ताराच्या योजना कार्यान्वित कराल. घरामध्ये दीर्घकाळानंतर लांबच्या भावंडाशी गाठभेट होईल.

तूळ : करियर आणि घर या दोन आघाडय़ांवर वेगवेगळे अनुभव देणारा हा आठवडा आहे. नोकरीच्या ठिकाणी कितीही काम केले तरी तुमचे समाधान होणार नाही. व्यापार-उद्योगाच्या ठिकाणी छोटे-मोठे बदल करून धनप्राप्ती वाढविण्याचा तुमचा इरादा असेल. घरामध्ये काही महत्त्वाचे बदल संभवतात. या आठवडय़ात गुरू राशीबदल करून धनस्थानात प्रवेश करेल. गुरूचे हे प्रमाण   फायदेशीर ठरेल. नोकरीमध्ये पगारवाढ होईल.

वृश्चिक : व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात चांगली झाल्यामुळे तुम्ही खूश असाल. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे हातावेगळी कराल. घरामध्ये काही चांगले संकेत मिळतील. या आठवडय़ात गुरू राशीबदल करून तुमच्याच राशीत प्रवेश करणार आहे. तेथे गुरूचे वास्तव्य एक वर्षांहून अधिक काळ असेल. हा संपूर्ण कालावधी तुमच्या दृष्टीने सर्वागीण प्रगती करणारा ठरेल. घरामध्ये सौख्यकारक वातावरण असेल.

धनू  : हे ग्रहमान फारसे चांगले नाही. महत्त्वाची कामे शक्यतो आठवडय़ाच्या सुरुवातीलाच करा. व्यापार-उद्योगात  बेकायदेशीर काम करू नका.  नोकरीच्या ठिकाणी सत्तेपुढे शहाणपण नसते हे लक्षात ठेवा. या आठवडय़ात गुरू राशीबदल करून व्ययस्थानात येईल. दरम्यान शनी तुमच्या राशीमध्ये आहे. व्यापार, उद्योग, नोकरीमध्ये  धोका पत्करू नका. घरामध्ये अनपेक्षित प्रश्नांना तोंड देण्यासाठी आर्थिक जबाबदारी स्वीकारावी लागेल.

मकर : ज्या कामामध्ये गेल्या आठवडय़ात अडथळे आले होते ती कामे संपविण्याचा तुम्ही चंग बांधाल. योगायोगाने त्याला आवश्यक व्यक्तींशी तुमची गाठभेट होईल. व्यापार-उद्योगात चांगले काम होईल. नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांच्या स्वार्थाकरिता तुमची स्तुती करतील. घरामध्ये एखादा महत्त्वाचा कार्यक्रम ठरेल. या आठवडय़ात गुरू राशीबदल करून लाभस्थानात प्रवेश करेल.  हा कालावधी अनेक प्रकारे फायदेशीर ठरेल.

कुंभ : आठवडय़ाच्या सुरुवातीला एखादे अवघड काम तुम्हाला करावे लागेल. पण नंतर सर्व गोष्टी मार्गी लागतील. व्यापार-उद्योगात कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी संस्थेबाबतीत उलटसुलट बातम्या कळतील. तुम्ही शांत राहा. घरामध्ये वादाचे प्रसंग टाळा. या आठवडय़ात गुरू राशीबदल करून दशमस्थानात प्रवेश करेल. हा कालावधी तुमच्या दृष्टीने यश आणि प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे.

मीन : प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ असते, ती गोष्ट या आठवडय़ात लक्षात ठेवा. व्यापार-उद्योगात कोणत्याही कामात आळस करून चालणार नाही. नोकरीच्या ठिकाणी प्रत्येक काम बिनचूक करण्यात भर ठेवा. घरामध्ये तुमच्या कर्तव्यामध्ये तुम्हाला चुकून चालणार नाही. या आठवडय़ामध्ये तुमच्या राशीचा अधिपती गुरू भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे. ताण-तणाव कमी होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2018 1:01 am

Web Title: astrology 5th september to 11th october 2018
Next Stories
1 भविष्य : दि. २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०१८
2 भविष्य – दि. २१ ते २७ सप्टेंबर २०१८
3 भविष्य : दि. १४ ते २० सप्टेंबर २०१८
Just Now!
X