– प्रमोद मनदाडे

“काय करू आता धरूनिया भीड।
निःशंक हे तोंड वाजवि‌ले।।
नव्हे जगी कोणी मुकीयाचा जाण।
सार्थक लाजून नव्हे हित।।”

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

बाबासाहेब आंबेडकर यांनी संत तुकारामांच्या अभंगाला प्रमाण मानत पत्रकारितेचा नवा मानदंड आपल्यापुढे ठेवला आहे. पण आजच्या मानवी अवमूल्यनाच्या काळात वृत्तपत्रे आणि पत्रकारिता लोकहिताच्या विरोधात, राज्यकर्त्यांच्या बाजूने वापरली जात आहे. सत्याचा विपर्यास करत अर्थाचा अनर्थ करणाऱ्या सवंग बाताच मुद्दाम खोडसाळपणे देत समाजात संभ्रम निर्माण करत आहेत. असाच एक खोडसाळ लेख चंदन हायगुंडे यांनी पंधरा एप्रिलच्या लोकसत्ता डॉट कॉमवर ” … म्हणून आनंद तेलतुंबडे आंबेडकरी नसून माओवादी विचाराचे वाटतात” अशा शीर्षकाचा लेख लिहिला. तो लेख दखलपात्र नसला तरी आनंद तेलतुंबडे यांची मुद्दाम बदनामी करणारा आहे. म्हणून हा लेखप्रपंच…

प्रथम चंदन हायगुंडेना आनंद माओवादी का वाटतात ते पाहू.

१) आनंद तेलतुंबडें माओवादी नेत्यास आपल्या काळातील भगतसिंग म्हणतात.
२) आनंद तेलतुंबडे माओवादी हिंसाचारास divine violence म्हणतात.
३) तेलतुंबडे, नवलाखा स्वतःच मुद्दाम आंबेडकर जयंतीला शरण आले.
हे तीन मुख्य आरोप कसे खोडसाळपणे केले आहेत ते आपण पाहू.

१) तेलतुंबडे माओवादी नेत्याला आजच्या काळातील भगतसिंग म्हणतात. हा आरोप S. “Shridhar potriat of the revolutionary as warrior intellectual” या खासगी वितरणासाठी तयार केलेल्या छोट्या पुस्तिकेतील आनंद तेलतुंबडे यांच्या दोन पानांच्या लेखावर आधारित आहे. ही पुस्तिका S. Shridhar यांच्या मित्रांनी आठवणी संकलित करण्याच्या दृष्टीने मित्रामित्रांत वितरित करण्यासाठी केली होती. ही पुस्तिका विक्रीसाठी वा अन्य लोकांसाठी लिहिली किंवा वितरित केली गेली नव्हती. अशा पुस्तिकेतील लेखाचा संदर्भ देत एखाद्याबद्दलच्या आयुष्यभराच्या वैचारिक साधनेला प्रश्न निर्माण करणे व त्याबाबत मत प्रदर्शित करणे कितपत योग्य आणि नैतिक आहे, हा मोठा प्रश्न आहे.
तरीही, या दोन पानांच्या लेखाचा मुद्दाम चुकीच्या पद्धतीने आधार घेतला आहे ते पाहू. या लेखात आनंद तेलतुंबडे माहिती देतात की ते श्रीधरला १९८०पासून ओळखत होते, ते त्यांच्या ज्ञानलालसेबाबतच्या आठवणी सांगतात. आनंद तेलतुंबडेंनी १९७९ साली मुंबई सोडली आणि त्यांचा मुंबईतील मित्रांशी संपर्क तुटला. त्यांना कोणीतरी सांगते की श्रीधर विदर्भात गेला आहे. नक्षलवादी नेता म्हणून श्रीधरला अटक झाल्याचे ते वर्तमानपत्रात वाचतात. आनंदच्या मते या श्रीधरला नक्षलवादी म्हणून शिक्षा झाली ती चुकीची होती.(या काळात मेधा पाटकरपासून अनेक कार्यकर्त्यांना खैरलांजीतील घटनेचा निषेध करणाऱ्यादेखील नक्षलवादी ठरवलं गेलं होतं.)

ती शिक्षा भोगून आल्यानंतर तब्बल वीस वर्षांनी श्रीधर आनंद तेलतुंबडे यांना भेटतात. तेव्हा श्रीधर आनंदजवळ परत चळवळीत काम करण्याची इच्छा व्यक्त करतो. चंदन हायगुंडे याबाबत खोडसाळपणे लिहितात की, भेटीदरम्यान श्रीधरने आपण पुन्हा (माओवादी) चळवळीत काम करणार असल्याचे तेलतुंबडे यांना सांगितले”. येथे चळवळीत काम करण्याचा उल्लेख असताना चंदन हायगुंडे वाक्यात कंसामध्ये माओवादी असा उल्लेख करतात. आणि पुढे लिहितात की जणू श्रीधर आणि आनंद तेलतुंबडे नक्षलवादी चळवळीबाबत बोलत होते. इथे तेलतुंबडे म्हणतात की श्रीधर पुन्हा माओवादी चळवळीत जाणार असल्याचे सांगतो. आणि आनंद तेलतुंबडे याबाबत विरोध करत नाहीत असा आरोप करत श्रीधरसारखे माओवादी आपल्या काळातील भगतसिंग आहेत असे पुढे लिहितात.

आनंद तेलतुंबडेंच्या या दोन पानी लेखात माओवाद हा शब्द फक्त दोन वेळा आला आहे. प्रथम श्रीधरच्या ‘माओवादी नेता’ म्हणूनच या अटकेबाबत आणि दुसरा जिथे आनंद श्रीधरला आपल्या काळातील भगतसिंग म्हणतात तिथे. कोठेही उल्लेख माओवादी चळवळीबाबत नाही. श्रीधरच्या संदर्भात माओवादी नावाचा उल्लेख त्याच्या विचारसरणीबाबतचा होता, माओवादी चळवळीबाबत नाही. माओ हा चीनच्या क्रांतीचा नेता व मार्क्‍सवादी परंपरेतील मोठा तत्त्वज्ञ होता. मार्क्सवादी विचारपरंपरा एकसुरी नाही, त्यात अनेक मतभेद, वेगवेगळे मार्ग आहेत. मार्क्सप्रमाणेच लेनिन, एम. एन. रॉय, रोजा लझ्येनबर्ग, टाॅट्स्की इत्यादींप्रमाणेच माओ हादेखील मार्क्सवादी परंपरेतील मोठा विचारवंत होता. त्याचे मार्क्स, लेनिन व अन्य कम्युनिस्ट यांच्यात अनेक बाबतींत मतभेद होते. आनंद तेलतुंबडे यांनी श्रीधरचा केलेला माओवादी उल्लेख या विचारपरंपरेचा आहे माओवादी चळवळीचा नाही.

या लेखात कोठेही उल्लेख व निर्देश नाही की श्रीधर तेलतुंबडे यांना माओवादी चळवळीत जाणार असल्याचे सांगितल्याचा. हा शोध चंदन हायगुंडेंना कसा लागला हे त्यांनाच माहीत. चळवळीत जाण्याचे सांगणे आणि माओवादी चळवळीत जाणार असल्याचे सांगणे या दोन्हींतील मोठा फरक चंदन हायगुंडेंना समजला नसावा.

आनंद तेलतुंबडे यांनी भगतसिंगाबरोबर केलेल्या तुलनेबाबत माझ्यासह अनेकांचे मतभेद असू शकतात. हा उल्लेख खासगी वितरणाच्या पुस्तिकेत केला आहे हे त्यामुळे याबाबत जाहीर चर्चा करणे कितपत सयुक्तिक असेल?

२) आनंद तेलतुंबडे यांनी माओवादी हिंसेला divine violence म्हणले आहे असा आरोप चंदन हायगुंडे अजय गुडावर्ती यांनी संपादित केलेल्या “Revolutionary violence versus democrucy : narrative from India” या पुस्तकातील examine the logic of Revolutionary violence ( क्रांतीमागच्या हिंसेच्या कारणाचं परीक्षण) या लेखावर आधारित आहे.

या लेखाच्या दुसर्‍या ओळीतच आनंद तेलतुंबडे माओवादी हिंसेमुळे निर्दोष स्थानिक लोक, सुरक्षा दलातील सैन्याच्या जीविताची मोठी हानी झाल्याची टीका करतात. हा लेख चार भागांत विभागला गेला आहे.

पहिल्या भागात हिंसेच्या अर्थाबाबत चर्चा आहे. यांचेबाबत चर्चा करताना आनंद तेलतुंबडे त्याची विभागणी प्रत्यक्ष हिंसा ( direct violence) आणि संस्थात्मक हिंसा ( structural violence) अशी दोन प्रकारे करतात. प्रत्यक्ष हिंसेत आणि संस्थात्मक हिंसेत फरक करताना ते म्हणतात की, संस्थात्मक हिंसा व्यक्तीची केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक हानीदेखील करतात. शोषणावर आधारित अन्यायी, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्था जी व्यक्तीच्या तिच्या अंगभूत ऊर्जेची, क्षमतेची जाणीव होण्यापासून वंचित करते व्यवस्था म्हणजे संस्थात्मक हिंसेवर आधारित व्यवस्था असते.

दुसऱ्या भागात क्रांतिकारक हिंसेची चर्चा करताना आनंद तेलतुंबडे म्हणतात की, संस्थात्मक हिंसेतच क्रांतिकारी हिंसेचा उगम असतो. क्रांतिकारक हे शोषणाचे संस्थात्मक स्वरूप बदलून वंचिताचे आयुष्य चांगले करण्याच्या, बदलण्याच्या इच्छेने झालेले असतात असे ते मांडतात.
तिसऱ्या भागात आनंद तेलतुंबडे मार्क्स आणि एंगल्सच्या हिंसेबाबतच्या दृष्टिकोनाची चर्चा करतात तेव्हा ते सप्रमाण दाखवून देतात की मार्क्स व एंगल्सला अहिंसात्मक बदलाचे वावडे नव्हते.

तर ते सुरुवातीच्या काळात अहिंसात्मक बदलाचे पक्षधर होते.

चौथ्या भागात भारतातील माओवादी हिंसेबाबत ते चर्चा करतात. आनंद तेलतुंबडे स्पष्टपणे लिहितात की माओवादी चळवळीने बंदुकीच्या भाषेबाबत पुनर्विचार केला पाहिजे. ते हे सुद्धा लिहितात की, इतिहास फ्रेंच क्रांती तील शेवटच्या पर्वातील जाकोबियनच्या दहशतीशी माओवादी चळवळीची तुलना करेल.

( जाकोबियन फ्रेंच क्रांतीतील अतिशय जहाल क्रांतिकारक मानले जातात. फ्रेंच क्रांतीच्या अखेरच्या काळात जाकोबियन क्रांतिकारकाच्या हिंसेने चरणसीमा गाठली होती, हा कालखंड दहशतीचा कालखंड म्हणून देखील ओळखला जातो.) आनंद तेलतुंबडे अशा दहशतीच्या हिंसेच्या इतिहासासोबत चळवळीची तुलना करतात. हे माओवादी चळवळीवरची त्यांच्या हिंसेबाबतची मोठी टिका आहे.

पुढे आनंद तेलतुंबडे लिहितात की फ्रेंच क्रांतिकारकाप्रमाणे‍ माओवादी चळवळीने त्यांचा वैचारिक आधार गमवला आहे. जरी त्यांची हिंसा राज्यसंस्थेच्या संस्थात्मक हिंसेला प्रश्न करत असल्यामुळे वॉल्टर बेंजामिन व डावपण झिझेल माओवादी हिंसेला divine violence संबोधले असते.( बहुदा हा संदर्भ जाकोबीय हिंसेबाबत असावा) येथे आनंद तेलतुंबडे नव्हे तर ते बेझामिन व झिझेल या तत्वज्ञानाचा दृष्टीकोण ते सांगत आहेत. ( moists may have loss their ideological anchor like french revolutionaries, but so long as they pase Challenge to present order there violence as Walter Benjamin and slavoj zizek may see, be regaraded as divine violence)
यात आनंद तेलतुंबडे कोठेही माओवादी हिंसेला divine violence म्हणत नाहीत. उलट ते माओवादी हिंसेला दहशतवादी हिंसा म्हणून संबोधतात. “Divine violence” हा शब्दप्रयोग उचलून चंदन हायगुंडे आनंद तेलतुंबडे यांचं लेखन न वाचताच वा समजून न घेताच अर्थाचा अनर्थ करतात.

३) तेलतुंबडे नवलाखा आंबेडकर जयंती लाच शरण का आले हा चमत्कारिक आरोप करत चंदन हायगुंडे तेलतुंबडे यांच्याबाबत संशय निर्माण करतात.

न्यायालयाने नवलाखा व तेलतुंबडे यांना 14 तारखेपर्यंत आठवड्याची मुदत पोलिसांना शरण येण्याकरिता दिली होती. कोणताही स्वातंत्र्य प्रिय व्यक्तीला आपले स्वातंत्र्य शेवटच्या क्षणापर्यंत प्रिय असते. जर न्यायालयाची मुदत 15 एप्रिल पर्यंत असती व आनंद तेलतुंबडे 14 ला पोलिसांसमोर हजर झाले असते तर हा प्रश्न रास्त होता पण कोणताही विचार न करता मुद्दाम संशयाचे वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने हादेखील आरोप केला आहे.

आनंद तेलतुंबडे मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या, भारताच्या सार्वजनिक जीवनात प्रबोधकाची भूमिका वठवत आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे दिली आहेत, वेगवेगळ्या संघर्षात सहभागी झाले आहेत, तसेच शोषणाविरुद्ध जनतेच्या हितासाठी सातत्याने आपली लेखणी वापरली आहे.

चंदन हायगुंडे म्हणतात की, ” तेलतुंबडेंची माओवादी चळवळीशी जवळीक दाखवणारी वैचारिक मांडणी, कृती संशयास्पद आहे” आनंद तेलतुंबडे यांनी जवळपास तीस पुस्तके लिहिली आहेत (अनेकांचे त्यांच्या त्यांच्या मांडणीबाबद मतभेद असू शकतात आणि आहेत ही) त्यातील कोणती वैचारिक मांडणी माओवादी चळवळीचे जवळीक मांडणारी आहे याबाबत कोणतीच मांडणी त्यांच्या लेखात नाही. आनंदच्या कुठल्यातरी लेखातील संदर्भ न देता काही वाक्ये उचलून ती चुकीच्या पद्धतीने मांडणे याला खोटारडेपणा म्हणतात आणि चंदन हायगुंडे तेच करतात.

कोणताही वाद आपल्याला आताच्या व्यवस्थेचे आकलन करण्यासाठी मदत करतो. आणि जर त्या विचाराला विवेकी पद्धतीने समजून न घेताच पकडून राहिले की त्या पोथ्या बनतात. विचार गतिशील असला पाहिजे कारण सभोवतालची व्यवस्था वेगाने बदलते आहे. आनंद तेलतुंबडे आपण कोणत्या विचारांशी बांधील आहोत? हे सांगताना म्हणतात की “मला कुठलाच वाद मान्य नाही. जे वाद होते तेंव्हा ते कामाचे होते आता त्यांचा उपयोग नाही. मग तो आंबेडकरवाद असो की मार्क्सवाद. काळ पूर्वी खूप संथ होता परिस्थितीत शंभर वर्ष फरक पडत नव्हता. आता मात्र एका वर्षातच खूप गोष्टी घडतात. भविष्यातील परिस्थिती समजून घेण्यासाठी आंबेडकरवाद किंवा गांधीवादाचे गृहीत लागू होणार नाही. बाबासाहेबांचे योगदान, त्या बद्दलची कृतज्ञता असणे आणि त्यांच्या नावाचा काही “सैद्धांतिक वाद” करणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जे बदल आता वेगाने होत आहे त्याला तुम्ही या वादात बसवू शकत नाहीत. आज जे काही घडले यापूर्वी कधी विचार केला नव्हता. मी जिथे काम करतो त्या “बिग डेटा” ने बदलले जग, जसं होतं तसे आता राहिलेले नाही उदाहरणार्थ आंबेडकर वादाचा विचार करू दलितांची परिस्थिती पाहून 1920 ते 1956 च्या काळात डॉ. बाबासाहेबांनी उभारलेल्या चळवळीतून जो विचार दिला त्याला आंबेडकर वाद म्हणतो. दलितांची परिस्थिती तेव्हा होती तशी आता राहिलेली नाही. मापदंड बदलले. या वादाचा आता आपण कसा उपयोग करून घेणार आहोत? आंबेडकर वादापेक्षा मार्क्सवादातील काही थेअरी मला मान्य होतात. त्यामध्ये एक वैज्ञानिक धाटणी आहे. ती मला पटते इतिहासाच्या बदलाचे मार्क्सवादाचे सूत्र आहे त्याने वर्ग संकल्पित केले तेही मला मान्य आहेत.”

म्हणून ते मार्क्सवादी विचारांचे आनंद तेलतुंबडे डोळे सतत उघडे ठेवून विचार करणारे विचारवंत आहेत. कोणत्याही वादाचे ते भक्त नाहीत.!

(लेखक मुंबईस्थित पीएचडी लिटरेचरचे विद्यार्थी आहेत)