१५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवापर्यंत असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीची अद्याप चर्चाच सुरू आहे. आघाडीची चर्चा पुढे सरकत नसल्याने राष्ट्रवादीचे नेते स्वबळाची तयारी करू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगरपालिका निवडणुकांचा कौल लक्षात घेता महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात, असे मत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मांडल्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्याला प्रतिसाद दिला. आघाडीची चर्चा सुरू असून, येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय अपेक्षित आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. आघाडीला आमची तयारी आहे. जिल्हा पातळ्यांवर चर्चाही सुरू आहे. आघाडीसाठी शेवटी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची आहे, अशी मार्मिक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.

ठाण्यात आघाडी, अन्यत्र चर्चाच 

ठाणे महानगरपालिकेत आघाडी करण्याचा तत्त्वत: निर्णय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घेतला आहे. सध्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. ठाण्यात आघाडी होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.

‘प्रभाग फेररचना, मतदार याद्यांत घोळ’

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी करण्यात आलेली प्रभाग फेररचना, मतदार याद्यांचे प्रारूप आणि अंतिम आराखडय़ामध्ये तफावत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रभागांमधील मतदारांची संख्या आणि लोकसंख्येत प्रचंड तफावत असून मतदार याद्यांमध्ये काही मतदारांची छायाचित्रासह संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याचा गौप्यस्फोटही काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी लोकसंख्येचा आधार घेत मुंबईतील प्रभागांची फेररचना करण्यात आली होती. मात्र या प्रभाग फेररचनेत अनेक घोळ झाले आहेत, अशी तक्रार नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली आहे. मतदार याद्यांचे प्रारूप आणि अंतिम आराखडय़ातही तफावत असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. याविरोधात शीतल म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Web Title: Congress ncp alliance in bmc election
First published on: 30-01-2017 at 01:31 IST