केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना त्यांच्या खास शैलीतील कविता सादर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं आणि काँग्रेसला टोले लगावले. काँग्रेसने मोदींसोबत ‘पंगा’ नये असं सांगताना त्यांनी काँग्रेसने पंगा घेतल्यास संकट त्यांच्या अंगाशी येईल, असा इशारा दिला. ही हिंदी कविता सादर करताना आठवलेंकडून अनेक मराठी शब्दही वापरले गेल्याने सभागृहात एकच हशा पिकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामदास आठवले यांनी राज्यसभेत सादर केलेली कविता :

“२०२२-२३ का निर्मला सितारामनजी का बजेट है विकास की गंगा, काँग्रेसवालो मत लो मोदीजीसे पंगा
मत भुलो वरलिया रंगा, नही तो संकट आ जायेगा अंगा
काँग्रेसने किया है भारत को भकास, लेकिन मोदीजीने किया है भारत का विकास
मोदीजीने तो दिया है अंधेरे मे प्रकाश इसलिए दिख रहा है निला निला आकाश”

“अर्थसंकल्प काँग्रेसला, विरोधी पक्षाच्या लोकांना प्रगती करण्याची संधी देणारा”

रामदास आठवले म्हणाले, “हा अर्थसंकल्प गरीबांना न्याय देणारा आहे. मध्यमवर्गीयांना पुढे जाण्याची संधी देणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प व्यवसाय करणाऱ्यांना देखील मदत करतो. काँग्रेस पक्षाला, विरोधी पक्षातील लोकांना प्रगती करण्याची संधी देणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वांच्या विकासासाठीचा हा अर्थसंकल्प आहे.”

“यावर्षी अनुसुचित जातींना १ कोटी ४२ लाख ३४२.३६ कोटी रुपये इतका निधी”

“अर्थसंकल्पात अनुसुचित जातीसाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षात १ लाख २६ हजार २५९.२० कोटी इतकी तरतुद होती. यावर्षी १ कोटी ४२ लाख ३४२.३६ कोटी रुपये इतका निधी मिळाला आहे,” असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

हेही वाचा : आता शिवसेना ऐकणार नाही, भाजपाने उपमुख्यमंत्रिपद घेऊन सेनेला पाठिंबा द्यावा : रामदास आठवले

यावेळी आठवलेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका भाषणाचाही संदर्भ घेतला. ते म्हणाले, “संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं, की माझा आदर्श समाज असा असेल जो समानता, बंधुत्वावर आधारीत असेल. लोकशाही केवळ सरकारचं स्वरुप नाही. लोकशाहीचं मूळ आपल्या सहकाऱ्यांप्रती आदर आणि सन्मानाची भावन आहे. आपल्याला यावर काम करण्याची गरज आहे.”

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale present poetry while speaking on budget modi government in parliament pbs
First published on: 11-02-2022 at 20:13 IST