Middle Class Employee: भारतातील अनेकांना स्वप्नवत पगाराच्या नोकऱ्या मिळत आहेत, तरीही मध्यमवर्गीयांमधील काहीजण अजूनही आर्थिक संघर्ष करत असल्याचे पाहायला मिळते. चार्टर्ड अकाउंटंट नितीन कौशिक यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते की, “वर्षाला १५-२५ लाख रुपये कमावणाऱ्या नोकरदारांना देखील अनेकदा असे का वाटते की, त्यांना आपले घर चालवणे देखील कठीण आहे.”

नितीन कौशिक यांच्या मते, समस्या त्यांच्या उत्पन्नाची नाही, तर ही प्रणाली त्यांना शांतपणे स्थैर्याच्या चक्रात कसे अडकवत आहे, त्याची आहे.

नितीन कौशिक यांनी या प्रकाराला आर्थिक घात म्हटले आहे. ज्यामध्ये कर, महागाई, जीवनशैलीचा वाढता खर्च, कर्ज आणि आर्थिक शिक्षणाचा अभाव यामुळे उत्तम कमाई करणाऱ्यांनाही त्रास होत आहे.

२० लाख रुपये पगार प्रभावी वाटू शकतो, परंतु एकदा तुम्ही कर (रु. २.५-३.५ लाख) वजा केला की, घर आणि कारचे हप्ते, शाळेचे शुल्क, भाडे आणि मूलभूत खर्चानंतर हातात काहीच उरत नाही. त्यांच्या शब्दांत, “तुम्ही जे कमावता ते संपत्ती नसते. तुम्ही जे बचत करता आणि जेव्हा ती वाढते तेव्हा त्याला संपत्ती म्हणतात.”

उत्पन्नाचे दुसरे साधन नाही

कौशिक यांनी पुढे असे नमूद केले आहे की, बहुतेक मध्यमवर्गीय नोकरदारांचे त्यांच्या ९ ते ५ या नोकरी व्यतिरिक्त दुसरे उत्पन्न नसते. उत्पन्नाचा दुसरा कोणताही मार्ग नाही, लाभांश नाही, भाड्याचे उत्पन्न नाही, चक्रवाढ नाही. जर पगार थांबला, तर जीवनही थांबते. मध्यमवर्गीय लोक एका मोठ्या ‘पॉज बटणासह’ येणाऱ्या एकाच पगारावर जगतात.

देणे विरुद्ध संपत्ती

हे लोक आणखी एक चूक करतात, ते देणी आणि मालमत्तेमध्ये गल्लत करतात. कागदावर फॅन्सी नवीन कार किंवा फ्लॅट कदाचित छान दिसेल, पण ईएमआयतून संपत्ती निर्माण होत नाही. ती फक्त भविष्यातील कमाई खाते. दरम्यान, ते स्टॉक्स किंवा रिअल इस्टेटमध्ये भीती किंवा ज्ञानाच्या अभावामुळे अनेकदा गुंतवणूक करणे दुर्लक्षित करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बचत खात्यातील मोठ्या रकमा

कौशिक बचत खात्यांमध्ये मोठ्या रकमा ठेवण्याच्या सवयीवरही टीका करतात, जिथे परतावा महागाईलाही मागे टाकत नाही. ते म्हणतात की, महागाई ६% वर असताना २.५-३% व्याज मिळवणारे १० लाख रुपये दरवर्षी प्रमाणे पैसे गमावत आहेत.