Bank FD vs SCSS: करोना काळामध्ये भारतासह अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली होती. या काळामध्ये केंद्र सरकारच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेंमुळे (SCSS) देशातल्या असंख्य नागरिकांना आर्थिक आधार मिळाला. मुदत ठेवींमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली जाते. मुदत ठेवींवर ६ टक्क्यांच्या व्याजदर दिला जातो. मे २०२२ पासून यामध्ये मोठा बदल करण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केल्याने प्रत्येक बॅंकेला मुदत ठेवींवरील व्याजदर काही टक्क्यांनी वाढवावा लागला. जेव्हा रिझर्व्ह बँक अन्य बॅंकांना कर्ज देते, तेव्हा त्यावरील दराला रेपो रेट असे म्हटले जाते. व्याजदर वाढवण्याच्या आरबीआयच्या निर्णयामुळे अनेकांना मुदत ठेव (FD) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) यांपैकी कोणता पर्याय निवडावा असा प्रश्न पडला आहे. या विषयासंबंधित तुलनात्मक माहिती देऊन प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही मदत करत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये केलेल्या तरतुदींप्रमाणे, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत ठेवींवर ८ टक्के व्याजदर दिला जात आहे. प्रत्येक बॅंकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना इतर उपभोत्यांपैकी ०.५० टक्के जास्त व्याजदर देण्यात येतो.
  • मुदत ठेवींमध्ये सात दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी पैसे गुंतवणे शक्य असते. थोड्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची असल्यास ग्राहक हा पर्याय निवडू शकतात. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत पाच वर्षांसाठी पैसे गुंतवता येतात. पाच वर्षांनंतर त्यावर मुदतवाढ देखील करता येते. असे केल्याने या बचत योजनेचा कालावधी आठ वर्षांपर्यंत पोहोचतो.
  • ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये कार्यकाळ पूर्ण होण्याआधी ठराविक रक्कम काढण्याची मुभा असते. गुंतवणूकदारांना आपत्कालीन परिस्थितीत मुदत ठेवींमधील पैसे काढण्याचा पर्याय बॅंकेतर्फे देण्यात येतो. पण मुदत पूर्ण होण्याआधी पैसे काढल्यावर ते तुमच्याकडून दंड आकारु शकतात.
  • दरवर्षी तीन महिन्यांच्या अंतराने म्हणजेच ३१ मार्च, ३० जून, ३० सप्टेंबर आणि ३१ डिसेंबर या दिवशी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत गुंतवलेल्या पैश्यांचे व्याज मिळते. बॅंकेमधील मुदत ठेवींच्या बाबतीमध्ये हा पर्याय उपलब्ध नसतो. यात मुदत पूर्ण झाल्यानंतर मुद्दल आणि व्याज एकत्रितपणे मिळते.
  • ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा एकूण कार्यकाळ हा ५ वर्षांचा असतो. परिणामी १९६१ च्या भारतीय कर कायद्यामधील ८० सी कलमाअंतर्गत रुपये १.५ लाख रुपयांपर्यंतची आयकर सवलत मिळते. बॅंकेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मुदत ठेवींसाठी पाच किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आयकर कपात मिळते.
  • मुदत ठेवींद्वारे मिळणाऱ्या व्याजदराबाबतचे निर्णय बॅंका घेत असतात. त्यांच्याद्वारे यात सुधारणा करण्यात येते. बचत योजनेमधील व्याजदराचे प्रत्येक तीन महिन्यांनी पुनरावलोकन केले जाते. तसेच व्याजदरामध्ये कधीही बदल करता येतात. जेष्ठ नागरिक बचत योजना ही देशातील इतर संस्थांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक व्याज देते.

सोनं खरेदी करताय? भारतातील ‘या’ शहरांमध्ये मिळतं सर्वात स्वस्त सोनं, नाव ऐकून हैराण व्हाल!

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank fd vs senior citizen savings scheme scscc what should senior citizens prefer to park their savings yps
First published on: 22-02-2023 at 14:27 IST