19 year old Dhravya Shah AI startup Supermemory raises 3 million dollars in Funding : ज्या वयात बहुतेक किशोरवयीन मुले भविष्यात कुठल्या शाखेतून शिक्षण घ्यावं आणि आयुष्यात आपल्याला काय करायचं याचा विचार करत असतात, त्या वयात मुंबईच्या १९ वर्षीय ध्राव्य शाह याने सिलिकॉन व्हॅलीमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.
कधीकाही शाह याचं कधीकाळी आयआयटीची प्रवेश परीक्षा उत्तर्ण होण्याचं ध्येय होतं, पण आता तो सुपरमेमरी (Supermemory) या एआय स्टार्टअपचा सीईओ आहे. या स्टार्टअपला ३ दशलक्ष डॉलर्सची सीड फंडिंग मिळाली आहे, आणि याला गुगलचे एआय प्रमुख जेफ डीन आणि डीपमाइंडचे लोगन किलपॅट्रिक यांसारख्या गुगलमधील वरिष्ठ एक्झिक्यूटीव्हजचा पाठिंबा आहे.
पण हे फक्त फंडिंगबद्दल नाही, तर शाह याचे हे स्टार्टअप भविष्यात शक्तिशाली AI मॉडेल्स माहिती कशी लक्षात ठेवतात आणि कालांतराने त्यावर प्रक्रिया कशी करतात यामध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवू शकते.
दिवसेंदिवस एआय मॉडल हे अधिक स्मार्ट बन आहेत, त्यांना प्रचंड मोठ्या डेटा बँकचा सपोर्ट मिळतो. पण यापैकी बहुतांश कंपन्यांना अडचण येत आहे ती मेमरीच्या बाबतीत. लार्ज लँग्वेज मॉडल्स(LLMs) हे दीर्घ काळासाठी माहिती लक्षात ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. यातच शाह याचे स्टार्टअप सुपरमेमरी हे ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ते एआय ॲप्लिकेशन्सना विभिन्न सत्रांमध्ये माहिती लक्षात ठेवण्यास आणि ती परत मिळवण्यास मदत करत आहे. आणि ही क्षमता डिजिटल सिस्टीम कशाप्रकारे संवाद साधतात, शिकतात आणि युजर एक्सपिरियन्स पर्सनलाइज करतात याचा चेहरा-मोहराच पूर्णपणे बदलू शकते.
ध्राव्य शाह आहे कोण?
TechCrunch ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या ध्राव्य शाह याला नेहमीत तंत्रज्ञान आणि कंस्युमर अॅप्स यांचे वेड होते. जेव्हा त्याच्या वयाची मुलं भारतातील सर्वात कठीण आयआयटीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करत होते, तेव्हा तो कोडिंग करत होता. या काळात त्याने ट्विटर ऑटोमेशन टूल तयार करून विकले. हे टूल ट्वीट्सचे आकर्षक स्क्रीनशॉट्समध्ये रूपांतर करत असे. त्याने हे टूल हायपफ्युरी (Hypefury) नावाच्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला विकले.
यातून मिळालेल्या पैशांमुळे आयआयटीच्या प्रवेश परीक्षेची तयारी त्याने सोडून दिली आणि अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी त्याने प्रयत्न सुरी केले. येथे त्याने ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला.
सुपरमेमरी काय आहे?
शाह हा सध्या सुपरमेमरी या एआय स्रार्टअपचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. त्याच्या या स्टार्टअपने एआय मेमरी एपीआय बनवली आहे, ज्यामुळे अॅप्लिकेशन्सना दीर्घ काळ संवादामधील डेटा लक्षात ठेवता येतो आणि प्रोसेस करता येतो. लिमिटेड कॉन्टेक्स्ट विंडोमुळे बहुतांश एआय सिस्टीम्सना याबाबत अडचणी येतात. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, सुपरमेमरीमुळे एआय मॉडल्सना, वेगवेगळ्या सेशन्समध्ये डेटा राखूण ठेवण्यास (retain), तो पुन्हा आठवण्यास (recall) आणि तो पर्सनलाइज करण्यास मदत होते.
हा प्लॅटफॉर्म कोणत्याही प्रकारचा डेटा, जसे की डॉक्युमेंट्स, चॅट्स, ईमेल, पीडीएफ, फाइल्स किंवा ॲप डेटा स्ट्रीम्स स्वीकारून त्यातून मेमरी काढू शकता. या मेमरीमुळे एआय अॅप्सना वापरकर्त्याबद्दल सखोल माहिती मिळते, त्यांचा परफॉपर्मन्स सुधारतो आणि पुढील काळात संवाद अधिक नैसर्गिक बनवला जातो.
सुपरमेमरीचे तंत्रज्ञान आधीच अनेक कंपन्यांद्वारे वापरले जात आहे. यात a16z -बॅक्ड Cluely, AI व्हिडीओ एडिटर Montra आणि AI सर्च इंजिन Scira यांचा समावेश आहे. याबरोबरच रोबोट्सने कॅप्चर केलेल्या व्हिज्युअल मेमरी सिस्टीमला लक्षात ठेवण्यास मदत करण्यासाठी हे स्टार्टअप रोबोटिक्स कंपन्यांबरोबरही काम करत आहे.
सुपरमेमरीला गुगलच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ
नुकताच सुपरमेमरीला ३ दशलक्ष डॉलर्सचे सीड फंडिंग मिळाले आहे. यामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील सुसा व्हेंचर्स (Susa Ventures), ब्रोऊडर कॅपिटल (Browder Capital) आणि SF1.vc यांचा समावेश आहे.
या गुंतवणूकदारांमध्ये गुगलचे एआय प्रमुख जेफ डीन, डीपमाइंडचे प्रॉडक्ट मॅनेजर लोगन किलपॅट्रिक, क्लाउडफ्लेअरचे सीटीओ डेन नेच्ट आणि DoNotPay चे संस्थापक जोशुआ ब्रॉउडर यांचा समावेश आहे.
मिळाला अमेरिकेतली O-1 व्हिसा
शाहाने १९ वर्षांच्या वयात एआय इनोव्हेशनमध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्याला अमेरिकेतील प्रतिष्ठेचा O-1 व्हिसा देखील मिळाला आहे.
हा व्हिसा अमेरिकेच्या सरकारकडून अशा व्यक्तींना दिला जातो, ज्यांच्याकडे त्यांच्या क्षेत्रात, जसे की विज्ञान, शिक्षण, व्यवसाय, ॲथलेटिक्स किंवा कला, विलक्षण क्षमता आहेत. हा व्हिसा बहुतांश वेळा टॉप शास्त्रज्ञ, उद्योजक आणि कलाकारांसाठी राखीव असतो.