What is Employees Provident Fund and How it Works : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही भारतातील सर्व पगारदार कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती बचत योजना आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) याच्या माध्यमातून या योजनेचे काम चालते. ही योजना नियोक्ता (Employer) – कर्मचारी (Employee) यांच्या योगदानातून कर्मचार्यांच्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घेते आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करते. या योजनेत नियोक्ता आणि कर्मचारी हे दोघेही कर्मचार्याच्या मूळ वेतनाच्या १२ टक्क्यांचे योगदान या निधीसाठी देतात, ज्यामधून पेन्शन, विमा आणि निवृत्तिच्या वेळी एकदाच मोठी रक्कम काढणे अशा स्वरुपाचे फायदे मिळतात.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी किंवा ईपीएफ (EPF) म्हणजे काय?
तर या योजनेत कर्मचाऱ्याचा नियोक्ता त्याच्या पगारातून दर महिन्याला एक ठराविक रक्कम कापून घेतो आणि तेवढ्याच रकमेची भर घालून ते पैसे तुमच्या ईपीएफ खात्यात टाकले जातात. तुम्ही ही बचत निवृत्तिनंतर काढू शकता किंवा तुमच्या आर्थिक गरजांसाठी त्यावर कर्ज देखील घेऊ शकता.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)
ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही एक भारत सरकारने निर्माण केलेली एक वैधानिक संस्था आहे. ही भारतातील सर्वात मोठ्या सोशल सेक्युरिटी ऑर्गनायजेशन पैकी एक आहे. १९५१ मध्ये पास करण्यात आलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ऑर्डिनन्सनंतर ईपीएफओची निर्मिती झाली. यानंतर १९५२ साली हे सुधारित कर्मचारी निर्वाह निधी कायद्याचा भाग बनले आणि सध्या हा कायदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा १९५२ म्हणून ओळखला जातो.
ईपीएफओ अंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या योजना
- कर्मचारी पेन्शन योजना (EPS)
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना (EPF)
- कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स योजना (EDLI)
ईपीएफओची उद्दिष्टे काय आहेत?
- प्रत्येक कर्मचाऱ्याचे एकच ईपीएफ खाते असेल याची काळजी घेणे.
- नियमांचे पालन करण्याची (compliance) पद्धत सोपी बनवणे.
- ईपीएफओने घालून दिलेले नियम आणि अटींचे पालन केले जाईल याची खात्री करणे.
- ऑनलाइन सेवांची विश्वासार्हता वाढवणे आणि त्या सेवांमध्ये सुधारणा करत राहणे.
- सर्व सदस्यांना त्यांच्या खात्याचा ऑनलाईन एक्सेस सहजपणे उपलब्ध करवून देणे.
- दाव्याच्या निपटारा करण्याच्या वेळेत २० दिवसांवरून ३ दिवसांपर्यंत घट करणे.
यूएएन (UAN) आणि ईपीएफओ (EPFO) पोर्टल
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्य ऑनलाईन पद्धतीने त्यांचे खाते तपासू शकता, यामध्ये पैसे काढून घेणे आणि शिल्लक रक्कम तपासणे अशा सेवा दिल्या जातात. यासाठी त्यांना एक यूनिक १२ अंकी- डिजीटल क्रमांक दिला जातो. यामध्ये सदस्यांना पासबुक डाउनलोड, केवायसी अपडेट आणि क्लेम फाइलिंग सारख्या सेवा दिल्या जातात. या सेवा वापरण्यासाठी नोकरी बदलते वेळेस तुम्हाला तुमचा यूएएन ऑनलाईन सक्रिय करावा लागतो.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी पात्रता
ईपीएफ योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला खालील निकष पूर्ण करावे लागतील –
- तुम्ही २० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थेत नोकरी करत असले पाहिजेत.
- तुमचे वय १८ ते ५४ वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे.
- तुमचा मूळ मासिक पगार (basic monthly salary) १५,००० रुपये किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
ईपीएफओ कोणत्या सेवा पुरवते?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) त्यांच्या सदस्यांना अनेक प्रकारच्या सेवा पुरवते. साधारणपणे या संघटनेकडून पुरवण्यात येणाऱ्या सेवा पुढील प्रमाणे –
१. ऑनलाइन नोंदणी
ईपीएफओचे एक ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ एस्टॅब्लिशमेंट पोर्ट आहे, याच्या मदतीने तुम्ही ईपीएफ खाते हाताळू किंवा त्याची नोंदणी करू शकता. जर तुम्ही नोकरी करत असलेली संस्था ईपीएफ आणि विविध तरतुदी कायदा १९५२ मध्ये आधीच उपलब्ध असलेल्या यादीत येत असेल, तर तुम्ही सहजपणे ऑनलाइन नोंदणी करू शकता. जर तुमची संस्था यादीत नसेल तर ईपीएफओ तुम्हाला स्वच्छेने साईन अप करण्याची परवानगी देते. ईपीएफओचा एक हेल्पडेस्क देखील आहे, तुम्ही टोल-फ्री क्रमांक १८०० ११८ ००५ वर कॉल करून मदत घेऊ शकता.
२. दुसर्या यूएएन सदस्यांचे तपशील पाहता येतात
यूएएन हा यूनिक कोड आहे आणि यामुळे तुमची सर्व पीएफ खाती एका छत्राखाली येतात. त्यामुळे तुम्ही ईपीएफओ मेंबर लॉग-इन पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमच्या कंपनीच्या वतीने, कंपनीतील सर्व सदस्यांच्या पीएफसंबंधीची माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी एक ओटीपी जनरेट करावा लागेल, आणि यानंतर तुम्ही दुसऱ्या सदस्यांची माहिती पाहू शकता. यामुळे तुमच्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती ही एका कंपनी यूएएनच्या अंतर्गत ठेवता येते.
३. ईपीएफ सबस्क्रिप्शनसाठी ऑनलाइन पैसे भरा
ईपीएफची सदस्यता घेल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात, पण हे फायदे मिळत राहावेत यासाठी तुम्हाला वार्षिक सदस्यता शुल्क भरावे लागेल. हे सोयीस्कर करण्यासाठी, ईपीएफओने एसबीआयशी करार केला आहे, ज्यामुळे तुम्ही नेट बँकिंग पर्यायाचा वापर करून सदस्यता शुल्क ऑनलाइन भरू शकता. तुमचे बँक खाते कोणतेही असले तरीही हा पर्याय काम करतो.
४. ऑनलाईन ईपीएफ चलन तयार करणे
ईपीएफओच्या मदतीने तुम्ही तुमचे ई-चलन रजिस्ट्रेशन ऑनलाईन देखील पूर्ण करू शकता. तुम्ही ईपीएफओच्या ई-सेवा पोर्टलवर नोंदणी केली की तुम्हाला एक यूनिक आयडी आणि पासवर्ड मिळेल. हा वापरून तुम्ही डिजीटल स्वाक्षरीसह माहिती भरू शकता आणि ही पीडीएफच्या स्वरूपात सेव्ह देखील करू शकता. तुम्ही याची प्रिंट काढली की तुम्ही हे अप्रु्व्ह करून घेऊ शकता, ज्यानंतर तुमचे ई-चलन हे ऑनलाईन तयार केले जाईल.
५. तक्रारींचे निवारण
बऱ्याचदा तुम्हाला काही शंका असतात, काही प्रश्न आणि तक्रारी देखील असतात ज्या तुम्ही ईपीएफओला विचारू शकता. ईपीएफओची तक्रार व्यवस्थापन प्रणाली ही तुमचे सगळे प्रश्न आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी तत्परतेने काम करते. यासाठी तुम्हाला फक्त एक तक्रार नोंदणी अर्ज भरावा लागेल. या अर्जामध्ये तुम्हाला तुमचे मेंबरशीप स्टेटस, पीएफ नंबर, संबंधित ईपीएफओ कार्यालय, तुम्हच्या कंपनीचे नाव, तुमच्या कंपनीचा पत्ता, तुमचे नाव, पत्ता, फोन क्रमांक आणि ईमेल आयडी इत्यादी माहिती भरावी लागेल. ही सर्व मागिती भरल्यानंतर ‘ग्रिव्हन्स डिस्क्रिप्शन’मध्ये तुमच्या तक्रारीचे तपशील द्यावा लागेल. तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती काय आहे हे देखील तपासू शकतात, यासाठी तुम्हाला तक्रार नोंदणी क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
६ . ऑनलाईन ट्रान्सफर क्लेम
या सेवेच्या माध्यमातून तुम्ही तुमचा क्लेम हवा तेव्हा हस्तांतरित करू शकता. तसेच तुम्हाला तुमचे सर्व ट्रान्सफर क्लेम पाहाता आणि व्यवस्थापित करता येतात. यामुळे तुम्हाला ऑनलाइन क्लेम पाहणे, पडताळणी करणे, मंजूर करणे आणि सबमिट करणे अशा सुविधा मिळतात.
नियोक्त्यांसाठी (employers) ईपीएफ नोंदणी प्रक्रिया –
तुमच्या कंपनीच्या ईपीएफ खात्यावरून नोंदणी केल्याने तुमच्या संस्थेला तुमच्या सर्व कर्मचार्यांना ईपीएफ इंडियाची सुविधा उपलब्ध होते. यामुळे तुमच्या संस्थेची विश्वासार्हता तर वाढतेच, याबरोबरच तुमच्या कंपनीची जबाबदार संस्था म्हणून प्रतिमा सुधारण्यास देखील याची मदत होते.
ईपीएफसाठी नोंदणी करताना तुम्हाला पुढील गोष्टींची आवश्यकता पडेल –
- मालकाची माहिती, ज्यामध्ये संचालकांचे आणि भागीदारांची पदे आणि त्यांचे पत्ते
- तुमच्या कंपनीचे नाव आणि पत्ते
- तुमचे मुख्य कार्यालय आणि शाखांची माहिती
- तुमच्या कंपनीच्या नोंदणी किंवा इनकॉर्पोरशनची तारीख
- सर्व कर्मचार्यांची माहिती आणि कर्मचार्यांच्या संख्या
- तुमच्या संस्थेकडून केल्या जाणाऱ्या कामाचा प्रकार
- तुमच्या संस्थेची कायदेशीर माहिती
- वेतन आणि पगारासंबंधी माहिती
- तुमच्या व्यवसायचे सर्व व्यवहार ज्याद्वारे केले जातात बँकेची माहिती
- तुमच्या कंपनीचे पॅन तपशील
- कव्हरेजसाठी पूर्णपणे भरलेला परफोर्मा सादर करा, यासह फॉर्म अ आणि Annexure 1 देखील सादर करावे लागेल.
कंपनीसाठी ईपीएफ खात्याची नोंदणी करण्याची प्रक्रिया –
- तुमची सर्व कागदपत्रे तयार ठेवा.
- ईपीएफओ ई-सेवा पोर्टलवर जा आणि सर्व सूचना वाचा आणि त्यांचे पालन करा.
- सर्व तपशील भरा आणि अर्ज सबमिट करा.
- कॅप्चा कोड जनरेट करा आणि तो दाखल करा आणि ‘गेट पिन’ पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडीवर आलेला गुप्त पिन टाका.
- ‘सबमिट करा’ वर क्लिक करा आणि PDF डाउनलोड करा.
- पीडीएफची एक प्रत सेव्ह करा आणि त्याची प्रत घ्या.
- ही प्रत नंतर ईपीएफ कार्यालयात जमा करा.
ईपीएफ ई-सेवा म्हणजे काय?
ई-सेवा हे एक पोर्टल असून याच्या माध्यमातून तुम्ही ईपीएफ संबंधीत अनेक कामे ईपीएफओ कार्यालयाला भेट न देताही पूर्ण करू शकता. या पोर्टलच्या मदतीने तुमच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील रक्कम काढू शकता, तुमच्या दाव्याचे स्थिती तपासू शकता, इतकंच नाही तर तुमची केवायसी माहिती देखील अपडेट करू शकता. ईपीएफओ ई-सेवाच्या विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या संस्थेची पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
ईपीएफओ तक्रार निवारण
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)कडून सदस्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर यंत्रणेची सोय करण्यात आली आहे. सदस्य त्यांचे ईपीएफ खाते, सेटलमेंट्स, रक्कम काढणे किंवा हस्तांतरित करणे यासारख्या कामांसाठी ईपीएफ ग्रिव्हन्स सिस्टमच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. यातून सदस्यांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण केले जाते.
तुमची तक्रार दाखल करण्यासाठी पुढे देण्यात आलेली सोपी पद्धत सदस्य वापरू शकतात-
- पहिल्यांदा ईपीएफ मेंबर वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर यावरील तक्रार विभागाला (grievance section) भेट द्या.
- तुमच्या युनिव्हर्सल अकाउंट क्रमांक (यूएएन) आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- त्यानंतर तुमच्या तक्रारीचा प्रकार निवडा, जसे की पैसे काढणे, सेटलमेंट किंवा अकाउंट डिटेल्स
- यानंतर संबंधित आवश्यक माहिती द्या आणि त्यासाठी आवश्यक असतील ती कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तक्रार सबमिट करा आणि त्यानंतर युनिक रजिस्ट्रेशन नंबर लिहून घ्या.
- या रजिस्ट्रेशन नंबर वापरून तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती तपासू शकता.
- एक नियुक्त अधिकारी तुमच्या तक्रारीची पडताळणी करेल.
- तुम्हाला याच्या अपडेट्स तुमच्या एसएमएस किंवा मेलवर मिळत राहातील.
- जर तुमची तक्रार सोडवली गेली नाही तर तम्ही पुन्हा पोर्टलवर तक्रार करू शकता.
- सामान्यतः तुमची अडचण १५ ते ३० दिवसांच्या आत सोडवली जाते.
- जर यामध्ये तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही ईपीएफ ग्रिव्हन्सला भेट देऊन याबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता.