लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

पुणे : कॉसमॉस बँकेला मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ३८४ कोटींचा निव्वळ नफा झाला असून, बँकेच्या इतिहासातील आतापर्यंतचा हा उच्चांकी निव्वळ नफा असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Economist Thomas Piketty research paper recommends that India tax the super rich person
अतिश्रीमंतांवर भारताने कर लावावा! अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी यांच्या शोधनिबंधात शिफारस
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Agra Income tas raids
पलंग, पिशव्या अन् चपलांच्या बॉक्समध्येही ऐवज! IT च्या धाडीत सापडलं कोट्यवधींचं घबाड, अधिकारी रात्रभर पैसेच मोजत बसले!
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Rajeev Jain GQG investment in Adani shares at 83111 crores
राजीव जैन यांच्या ‘जीक्यूजी’ची अदानींच्या समभागातील गुंतवणूक ८३,१११ कोटींवर; वर्षभरात १५० टक्क्यांची वाढ

मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय ३५ हजार ४०८ कोटी रुपये झाला असून, त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात एकूण ४ हजार ६६२ कोटी रुपयांची वाढ झाली, असे काळे म्हणाले. बँकेच्या एकूण ठेवी २० हजार २१६ कोटी रुपयांवर पोहोचल्या असून त्यात २ हजार ५८७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बँकेचे कर्ज वितरण १५ हजार १९२ कोटी रुपये झाले असून त्यात २ हजार ७५ कोटी रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. बँकेचे ढोबळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) ३.२२ टक्के असून निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (नेट एनपीए) १.५४ टक्के आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) १५.४३ टक्के आहे. बँकेला मार्चअखेर ४६१ कोटींचा करपूर्व नफा झाला असून ३८४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या विक्रमी कामगिरीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे अतिरिक्त वेतन बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

हेही वाचा >>>रिलायन्स कॅपिटलची दिवाळखोरी प्रक्रियेसाठी मुदतवाढीची ‘एनसीएलटी’कडे मागणी

मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने मुंबईमधील मराठा सहकारी बँक (७ शाखा) आणि साहेबराव देशमुख सहकारी बँक (११ शाखा) या दोन बँकांचे विलीनीकरण करून घेतले. या विलीनीकरणामुळे मुंबईसारख्या शहरामध्ये बँकेच्या ५० शाखा कार्यरत झाल्या आहेत. कॉसमॉस बँकेच्या ७ राज्यांत एकूण १७० शाखा आहेत. बँकेने आतापर्यंत एकूण १८ छोट्या सहकारी बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे. या विलीनीकरणामुळे लाखो ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण झाले आहे, अशी माहिती बँकेचे उपाध्यक्ष यशवंत कासार यांनी दिली.