Important Notice: तुम्ही सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाचे डेबिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण ३१ ऑक्टोबरनंतर BOI डेबिट कार्ड निरुपयोगी होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कार्डवरून कोणताही व्यवहार करू शकणार नाही किंवा एटीएममधून पैसे काढू शकणार नाही. ही समस्या टाळण्यासाठी सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिली आहे. जाणून घेऊया संपूर्ण बातमी काय आहे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः Money Mantra : PM विश्वकर्मा योजना आरबीआयच्या PIDF मध्ये सामील, मुदत आणखी २ वर्षांसाठी वाढवली, कारागिरांना होणार फायदा

३१ ऑक्टोबरपर्यंत तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट करा

बँक ऑफ इंडियाने (BOI) ट्विट करून ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, BOI च्या ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. प्रिय ग्राहक, नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार डेबिट कार्ड सेवांचा लाभ घेण्यासाठी वैध मोबाइल क्रमांक अनिवार्य आहे. डेबिट कार्ड सेवा बंद होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या शाखेला भेट द्या आणि ३१ ऑक्टोबर २०२३ पूर्वी तुमचा मोबाइल नंबर अपडेट/नोंदणी करा. जर तुम्ही BOI चे ग्राहक असाल आणि बँकेचे डेबिट कार्ड वापरत असाल, तर कोणताही विलंब न करता शाखेत जा आणि तुमचा मोबाईल नंबर नोंदवा किंवा अपडेट करा. अन्यथा तुम्ही तुमचे डेबिट कार्ड वापरू शकणार नाही.

हेही वाचाः आनंद महिंद्रांच्या दोन मुली काय करतात? दिव्या अन् अलिकाची संपत्ती किती?

बँकेच्या शाखेत जाऊन नंबर अपडेट करा

जर तुम्ही बँकेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक ऑनलाइन किंवा एटीएमद्वारे बदलू शकत नसाल, तर तुम्ही थेट शाखेत जाऊन हे काम करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन मोबाईल नंबर बदलण्यासाठी चेंज फॉर्म भरावा लागेल. त्यात विचारलेली माहिती भरा. याबरोबरच पासबुक आणि आधार कार्डची फोटो प्रतही सादर केली जाणार आहे. फॉर्म भरल्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलेल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A big warning to the customers of boi government bank debit card will be closed after 31st october 2023 withdrawal will not be possible vrd
First published on: 09-10-2023 at 17:22 IST