मुंबई : गृहवित्त क्षेत्रातील आधार हाऊसिंग फायनान्सची विक्री येत्या ८ मेपासून सुरू होणार असून १० मेपर्यंत गुंतवणूकदारांना आयपीओसाठी अर्ज करता येईल. कंपनीने या भागविक्रीसाठी ३०० ते ३१५ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

येत्या ७ मे रोजी सुकाणू गुंतवणूकदारांना आयपीओसाठी बोली लावता येईल. आयपीओच्या माध्यमातून कंपनीचा ३,००० कोटी रुपयांचा निधी उभारणीचा मानस आहे. १,००० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करण्यात येईल. तर विद्यमान प्रवर्तकांच्या मालकीच्या आंशिक समभाग विक्रीच्या (ओएफएस) माध्यमातून २,००० कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. ब्लॅकस्टोन समूहाची संलग्न कंपनी असलेल्या बीसीपी टॉप्को कंपनी ओएफएसद्वारे समभाग विक्री करणार आहे. बीसीपी टॉप्कोची आधार हाउसिंग फायनान्समध्ये ९८.७२ टक्के हिस्सेदारी आहे, तर खासगी क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेकडे उर्वरित १.१८ टक्के हिस्सेदारी आहे.

Vodafone
व्होडाफोनकडून इंडस टॉवर्समधील १८ टक्के भागभांडवल १५,३०० कोटींना विक्री
Job Opportunity Contract in Heavy Vehicles Factory
नोकरीची संधी: हेवी वेहिकल्स फॅक्टरीमधील संधी
SBI Mutual Fund assets,
एसबीआय म्युच्युअल फंडाची मालमत्ता विक्रमी १० लाख कोटींवर
CAPF recruitment 2024: Registration begins for 1526 HC Ministerial and ASI posts
CAPF Recruitment 2024 : असिस्टंट सब इंस्पेक्टर, हेड कॉन्स्टेबलच्या १५२६ पदांवर होणार भरती; ‘या’ वयोगटातील महिला-पुरुष करू शकतात अर्ज
adani group shares jump 12 percent as exit polls indicate nda victory
‘मोदी ३.०’ विजयाच्या अंदाजाने अदानी समूहातील समभागांमध्ये तेजीचे वारे; कंपन्यांचे बाजारमूल्य हिंडेनबर्ग-झळ झटकून पूर्वपदावर
adani group companies share surge
लोकसभेच्या निकालाआधी अदाणी समूहाचे शेअर्स वधारले; गौतम अदाणी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Beneficiary of changing economic momentum Tata Banking and Financial Services Fund
बदलत्या अर्थगतीचा लाभार्थी: टाटा बँकिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड
ESOP Tax Implications, ESOP Tax, Employee Stock Ownership Plans, Home Loan Deductions, Rent Withholding, and Advance Tax for Senior Citizen,
कर्मचारी समभाग मालकी योजना (ईसॉप) आणि करपात्रता

हेही वाचा >>> Googleने कोअर टीममधील ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ, पण भारतीयांसाठी सुवर्णसंधी!

समभाग विक्रीतून उभारण्यात येणाऱ्या एकूण निधीपैकी ७५० कोटी रुपये भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार आहे. आयपीओमधील ५० टक्के समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १५ टक्के समभाग बिगरसंस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आधार हाऊसिंग फायनान्स तारण-आधारित कर्जे वितरित करते, ज्यामध्ये निवासी मालमत्ता खरेदी आणि बांधकामासाठी कर्ज समाविष्ट आहे. गृह सुधार आणि विस्तार कर्ज; आणि व्यावसायिक मालमत्ता बांधकाम आणि संपादनासाठी कर्जदेखील ती देते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि अल्प-मध्यम-उत्पन्न ग्राहकांना सेवा देते. ३० सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत कंपनी ९१ कार्यालयांसह ४७१ शाखा हाताळते.