मुंबई: मूल्यवर्धित पोलादाच्या क्षेत्रातील अग्रणी मुंबईस्थित अभय इस्पातने त्यांच्या समर्पित सेवा विभागाची नुकतीच घोषणा केली. या ग्राहककेंद्रित धोरणात्मक विस्ताराचे उद्दिष्ट पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतातील एमएसएमई ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करणे असून, ज्याअंतर्गत प्रमुख औद्योगिक केंद्रांजवळ प्रगत प्रक्रिया सुविधा स्थापित करण्याची योजना आहे.
कलर-कोटेड स्टीलवर २० वर्षांच्या वॉरंटीसाठी कंपनीची कलरशाइन ही उत्पादन नाममुद्रा प्रसिद्ध आहे. त्यावर आधारित, विशेष विभागाच्या उल्लेखनीय यशानंतर, आता केवळ उत्पादनांद्वारेच नव्हे तर सेवांद्वारे देखील मूल्य निर्माण करण्यासाठी पाऊल टाकले जात आहे, असे अभय इस्पातचे अध्यक्ष विनेश मेहता म्हणाले. नवीन सेवा विभाग अत्याधुनिक पोलाद प्रक्रिया क्षमता प्रदर्शित करेल ज्याचे लक्ष्य २० दशलक्ष टनांपर्यंत वाढीचे आहे. ऑटोमोटिव्ह, प्री-इंजिनिअर्ड बिल्डिंग्ज (पीईबी), वेअरहाऊसिंग आणि पायाभूत सुविधा उद्योगांसाठी यातून सानुकूल उपाय प्रदान करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
स्थान, विभाजन आणि प्रगत यंत्रसामग्री संरेखित करून, अतुलनीय दर्जा आणि कमी वेळेत सानुकूल उपायांची हमी यातून अभय इस्पातने ग्राहकांना देऊ केली आहे. नवीन सेवा केंद्रे सूक्ष्म, लघू व मध्यम (एमएसएमई) उद्योगांना कंपनीच्या स्टील सोल्यूशन्सद्वारे सक्षम करतील. विभाजन, स्थान आणि अचूकता हे या नवीन विभागाचे पाया आहेत. आमचे ग्राहक जिथे आहेत त्यांच्या समीप राहण्याचे कंपनीचे ध्येय असून, त्यांना कार्यक्षमता प्रदान करण्यासह, कामगिरी सुधारणारे उपाय प्रस्तुत केले जातील, याची खात्री केली जाईल.
अभय इस्पातचे कलरशाइन ब्रँडने हे टिकाऊ, हवामान-प्रतिरोधक आणि पर्यावरणपूरक छपरांसाठी प्रसिद्ध असून, नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मानके स्थापित केली आहेत. १९४८ पासूनचा वारसा असलेली कंपनी, सतत उत्पादन विकसासह भारताच्या पोलाद उद्योगात आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्नरत आहे. नवीन सर्व्हिस स्टेशन डिव्हिजन मोठ्या प्रमाणात प्रकल्प आणि एमएसएमई उद्योगांना समर्थन देणारी लवचिक परिसंस्था तयार करण्याच्या कंपनीच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचे उदाहरण आहे.