Accenture layoffs : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅक्सेंचर (Accenture)ने गेल्या तीन महिन्यांत ११ हजाराहून अधिक जागतिक स्तरावरील कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढल्याची बाब समोर आली आहे. इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगासाठी प्रशिक्षित केले जाऊ शकणार नसेल तर भविष्यात आणखी लोकांना घरी पाठवले जाऊ शकते असे संकेत या कंपनीने दिले आहेत.
या कंपनीने गुरूवारी ८६५ दशलक्ष डॉलर्सच्या रिस्ट्रक्चरिंग प्रोग्रामबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ज्यामध्ये कन्सल्टींग प्रोजेक्ट्ससाठी कमी झालेली मागणी आणि अमेरिकेतली फेडरल खर्च कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
“आम्हाला आवश्यक असलेल्या कौशल्यासाठी रीस्किलिंग (reskilling), आमच्या अनुभवानुसार व्यवहार्य नाही, अशा लोकांना आम्ही त्वरित कमी वेळेत बाहेर काढत आहोत,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी जुली स्वीट यांनी अॅनालिस्ट (analysts) शी झालेल्या कॉन्फरन्स कॉलमध्ये सांगितले.
या कंपनीमध्ये ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ७ लाख ७९ हजार कर्मचारी कमा करत होते, जी संख्या तीन महिन्यांपूर्वीच्या काम करत असलेल्या ७ लाख ९१ हजार कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी आहे. अॅक्सेंचरने रिस्ट्रक्चरिंग, सेव्हरन्स आणि इतर खर्च दरम्यान नेमक्या किती नोकऱ्यांवर याचा थेट परिणाम झाला हे स्पष्ट केलेले नाही. गेल्या तीन महिन्यात सेव्हरन्स आणि इतर खर्चाचा एकूण आकडा ६१५ दशलक्ष डॉलर्स इतका होता आणि चालू तीन महिन्यांच्या कालावधीत अतिरिक्त २५० दशलक्ष डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे.
कर्मचारी कपात केली जात असली तरी अॅक्सेंचरने म्हटले आहे की, आगामी आर्थिक वर्षात कंपनी आपला ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन त्यांच्या वार्षिक दरानुसार किमान १० बेसिस पॉइंट्सने वाढवत राहील. ऑगस्टमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने ६९.७ अब्ज डॉलर्स इतके उत्पन्न नोंदवले, जे मागील वर्षापेक्षा ७ टक्क्यांनी जास्त आहे, तर कंपनीचा निव्वळ नफा ७.८३ अब्ज डॉलर्स असून, तो ६ टक्क्यांनी वाढला आहे.
कंपनीचे लार्ज-स्केल ट्रान्सफॉर्मेशन वर्क मजबूत स्थितीत आहे, तर शॉर्ट-टर्म कन्सल्टिंग प्रोजेक्टची मागण मात्र गेल्या दोन वर्षांपासून कमी झाली आहे. आत्ताच सुरू झालेल्या आर्थिक वर्षात कंपनीने २ ते ५ टक्के उत्पन्न वाढीचा अंदाज वर्तवला आहे.
अॅक्सेंचरने सांगितले की, नुकत्याच संपलेल्या वर्षात कंपनीला मिळालेल्या नवीन कामांपैकी जनरेटिव्ह एआय प्रोजेक्टची किंमत ५.१ अब्ज डॉलर्स इतकी होती, जे मागील वर्षाच्या $३ अब्ज डॉलर्सपेक्षा खूपच जास्त आहे. “आम्ही रीइन्व्हेटर्सच्या अपस्किलींगमध्ये गुंतवणूक करत आहोत, ही आमची प्रायमरी स्टॅजर्जी आहे आहे,” असे स्वीट यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की, दोन वर्षांपूर्वी कंपनीत ४० हजार एआय किंवा डेटा प्रोफेशनल्स होते, ही संख्या आता ७७ हजारापर्यंत वाढली आहे.