मुंबई : उद्योग-व्यापार क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’ या देश पातळीवरील संस्थेच्या अध्यक्षपदी अमेय प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. अमेय प्रभू यांच्या नियुक्तीचे वृत्त सर्वप्रथम त्यांचे वडील, माजी केंद्रीय रेल्वे आणि ऊर्जा मंत्री सुरेश प्रभू यांनी समाजमाध्यमात टिप्पणीद्वारे दिले.
अमेय प्रभू हे मुंबईस्थित आर्थिक सल्लागार संस्था नाफा कॅपिटल ॲडव्हायजर्स कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. अर्थशास्त्राची भक्कम पार्श्वभूमी आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे एक तरुण जागतिक नेता म्हणून गौरविलेले गेलेले प्रभू हे प्रसिद्ध लेखक देखील आहेत.
हेही वाचा : आता परदेशात शेअरचे लिस्टिंग होणार
‘द बाबा रॉक बाबाज् आणि अदर स्टोरीज’ हे त्यांचे पुस्तक विक्रमी खपाचे ठरले आहे. प्रभू हे अनेक सामाजिक संस्थांच्या महत्त्वाच्या पदांवर देखील सक्रिय आहेत. संस्थेच्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून अभ्युदय जिंदल आणि उपाध्यक्ष ब्रिजभूषण अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत केले.