मुंबई: विद्युत दुचाकी निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘एथर एनर्जी’ने मंगळवारी भांडवली बाजारात २ टक्क्यांच्या अधिमूल्यासह पदार्पण केले. समभाग ३२१ रुपये या वितरण किमतीच्या तुलनेत राष्ट्रीय शेअर बाजारात २.१८ टक्क्यांच्या अधिमूल्यासह ३२८ रुपयांवर सूचिबद्ध झाला. मुंबई शेअर बाजारात ३२६.०५ रुपयांच्या किमतीवर समभागाने व्यवहार सुरू केले.

‘एथर एनर्जी’चा समभाग ३२८ रुपयांवरून सुरुवात करीत सत्रातील व्यवहारात ३३२.९० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर झेपावला. तर ३०० रुपये हा त्याचा दिवसातील तळ राहिला. दिवसअखेर समभाग २३.५५ रुपयांच्या घसरणीसह म्हणजेच ७.२२ टक्क्यांनी घसरून ३०२.५० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे ११,२६६ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एथर एनर्जीच्या २८ एप्रिल ते ३० एप्रिल कालावधीत प्रत्येकी ३०४ ते ३२१ रुपये किमतीला झालेल्या ‘आयपीओ’ला गुंतवणूकदारांनी १.४३ पटीने अधिक भरणा करणारा प्रतिसाद दिला होता.