PMJAY Scheme Report : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) शी संबंधित नोंदणी आणि पडताळणीच्या बाबतीत एक मोठी अनियमितता समोर आली आहे. जवळपास ७.५ लाख एवढे लाभार्थी ९९९९९९९९९९ या एकाच मोबाइल नंबरशी जोडलेले होते, अशी धक्कादायक माहिती भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) ने उघड केली आहे. सोमवारी लोकसभेत मांडलेल्या आयुष्यमान भारत-पीएमजेएवायच्या कामगिरीवरील लेखापरीक्षण अहवालात कॅगने हा खुलासा केला आहे. एकूण ७,४९,८२० लाभार्थी योजनेच्या लाभार्थी ओळख प्रणाली (BIS) मध्ये एकाच मोबाइल नंबरशी जोडलेले होते.

‘या’ क्रमांकांवर जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी केली

BIS डेटाबेसमध्ये असे दिसून आले की, मोठ्या संख्येने लाभार्थी एकाच किंवा अवैध मोबाईल नंबरवर नोंदणीकृत आहेत. एकूण BIS डेटाबेसमध्ये १११९ ते ७,४९,८२० लाभार्थी एकाच मोबाईल क्रमांकाने जोडले गेले होते. ९९९९९९९९९९ शी जोडलेल्या ७,४९,८२० लाभार्थ्यांव्यतिरिक्त १,३९,३०० लाभार्थी फोन नंबर ८८८८८८८८८८ वर लिंक झाले आहेत आणि ९६,०४६ लाभार्थी ९००००००००० नंबरशी लिंक आहेत. आतापर्यंत ७.८७ कोटी लाभार्थी कुटुंबांची नोंदणी झाली आहे, जी १०.७४ कोटी (नोव्हेंबर २०२२) लक्ष्यित कुटुंबांपैकी ७३ टक्के आहे. मात्र, नंतर सरकारने उद्दिष्ट वाढवून १२ कोटी केले, असंही अहवालात म्हटले आहे.

हेही वाचाः HDFC बँकेने MCLR दरात केली वाढ, आता ग्राहकांचा EMI महागणार

अहवालात नेमके काय आहे?

अहवालात म्हटले आहे की, डेटाबेसमधील कोणत्याही लाभार्थीशी संबंधित रेकॉर्ड शोधण्यासाठी मोबाइल क्रमांक महत्त्वाचे आहेत, जे आयडीशिवाय नोंदणी डेस्कवर जाऊ शकतात. ई-कार्ड हरवल्यास लाभार्थी ओळखणेही कठीण होऊ शकते. यामुळे पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात.

हेही वाचाः मुकेश अंबानींनी घर विकले, जाणून घ्या किती किंमत मिळाली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुद्द्यावर NHA ने म्हटले आहे की, BIS २.० आल्याने ही समस्या दूर होणार आहे. लाभार्थी सशक्तीकरण मार्गदर्शक पुस्तिका प्रदान करते, त्यामध्ये संपर्क क्रमांकाचा उपयोग लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यापासून ते डिस्चार्जनंतरच्या फीडबॅकपर्यंत केला जातो. BIS ई-कार्ड बंद करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतात. तसेच SHA कार्ड निर्मितीच्या वेळी प्रदान केलेल्या संपर्क क्रमांकावर एसएमएस सूचना पाठवली जाते आणि लाभार्थ्यांना त्यांची पात्रता तपासण्यासाठी सूचित केले जाते.