How to Apply for Baal Aadhaar Card : भारत सरकार भारतीय नागरिकांना अनेक सेवा देण्यासाठी आधार कार्डचा वापर करते. आधार कार्ड हे पत्त्याचा आणि ओळखीचा पुरावा म्हणून काम करते. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड वापरले जाते. आता लहान मुलांचे आधार कार्ड बनवले जाते. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नुसार, १ वर्षापेक्षा जास्त वयाची मुले आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. बाल आधार कार्डमुळे मुलांना आणि त्यांच्या पालकांना विविध योजनांचा लाभ घेता येतो.

लहान मुलांच्या आधार कार्डमध्ये मुलांचा बायोमेट्रिक्स अपडेट घेतले जात नाही. मुलांचे आधार कार्ड हे पालकांच्या आधार कार्डशी लिंक केले जाते. मूल ५ वर्षाचे झाल्यानंतर त्याचे बायोमेट्रिक्स अपडेट प्रथम घेतले जातात. मुलांची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांदा बायोमेट्रिक्स घेतले जातात. बाल आधार कार्डचा रंग निळा आहे. मुलाच्या आधार कार्डवर ‘मुलाच्या वयाच्या ५ वर्षांपर्यंत त्याची वैधता’ असे लिहिलेले असते. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नुसार, मुलांचे आधार कार्ड बनवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

बाल आधार कार्ड प्रक्रिया (Baal Aadhaar Card Process)

तुम्ही बाल आधार कार्ड नोंदणी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे करू शकता. जर तुम्हाला ऑनलाइन पद्धत सोयीची वाटत नसेल, तर तुम्ही ऑफलाइन नोंदणीसाठी तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देऊ शकता. एका पालकाला त्यांचे आधार कार्डदेखील सादर करावे लागेल.

बाल आधार कार्ड ऑनलाइन नोंदणी (Baal Aadhaar Card Online Registration)

बाल आधार कार्ड ऑनलाइन नोंदणीसाठी येथे वाचा:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • स्टेप १ : अधिकृत UIDAI वेबसाइटला भेट द्या.
  • स्टेप २ : तुम्हाला वेबसाइट पाहायची असलेली भाषा निवडा.
  • स्टेप ३ ‘माझे आधार’ वर क्लिक करा आणि ‘अपॉइंटमेंट बुक करा’ पर्यायावर क्लिक करा.
  • आधार अपॉइंटमेंट
  • स्टेप ४ : ‘UIDAI-रन आधार सेवा केंद्रात अपॉइंटमेंट बुक करा’ या पर्यायाखाली तुम्हाला जिथे अपॉइंटमेंट बुक करायची आहे ते शहर निवडा आणि ‘अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी पुढे जा’ वर क्लिक करा.
  • बाल आधार नोंदणी
  • स्टेप ५ : नवीन पेजवर, तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा एंटर करा आणि ‘ओटीपी मिळवा’वर क्लिक करा.
  • स्टेप ६ : ओटीपी एंटर करा आणि तुमच्या अपॉइंटमेंटची तारीख निवडा.
  • स्टेप ७ : तुम्हाला तुमच्या अपॉइंटमेंटबद्दल एसएमएसद्वारे सूचित केले जाईल.
  • स्टेप ८ : अपॉइंटमेंटच्या तारखेला आधार केंद्राला भेट द्या.
  • स्टेप ९ : ज्या पालकांचे आधार कार्ड बाल आधार कार्डशी लिंक केले जाईल त्यांनी त्यांचे बायोमेट्रिक्स आणि त्यांचे आधार कार्ड तपशील सादर करावे लागतील. मुलांना त्यांचे बायोमेट्रिक्स द्यावे लागणार नाहीत.
  • स्टेप १०: केंद्रात तुम्ही भरलेल्या अर्जासह सर्व संबंधित कागदपत्रे सादर करा. मूळ कागदपत्रे स्कॅन केली जातील आणि पालकांना परत केली जातील.
  • बाल आधार कार्ड पोस्टाद्वारे तुमच्या घरी पाठवले जाईल.

बाल आधार कार्डसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा? ( Baal Aadhaar Card Offline Process)

तुम्ही तुमच्या मुलासाठी आधार कार्ड मिळविण्यासाठी बाल आधार कार्ड नोंदणी ऑफलाइनदेखील करू शकता. कृपया लक्षात ठेवा की, आधार नोंदणी मोफत आहे. बाल आधार कार्डसाठी ऑफलाइन नोंदणी करण्यासाठी येथे खालील स्टेप लक्षात ठेवा:

  • स्टेप १: तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जा. तुम्ही अधिकृत UIDAI वेबसाइटवरून तुमचे जवळचे नावनोंदणी केंद्र शोधू शकता.
  • स्टेप २: केंद्रावर अधिकारी तुम्हाला बाल आधार कार्डसाठी अर्ज फॉर्म देतील, तो भरा.
  • स्टेप ३ : ज्या पालकांचे आधार कार्ड बाल आधार कार्डशी जोडले जाईल त्यांनी त्यांचे बायोमेट्रिक्स आणि त्यांचे आधार कार्ड सादर करावेत. मुलाला त्यांचे बायोमेट्रिक्स मागितले जाणार नाहीत.
  • स्टेप ४ : अर्ज फॉर्मसह संबंधित कागदपत्रे सादर करा. मूळ कागदपत्रे स्कॅन केली जातील आणि पालकांना परत केली जातील.
  • स्टेप ५ : तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांकासह पावती स्लिप मिळेल. तुमच्या मुलाच्या ‘बाल आधार’ची स्थिती तपासताना हे उपयुक्त ठरू शकते.
  • नोंदणी झाल्यानंतर ६०-९० दिवसांच्या आत UIDAI तुमच्या पोस्टल पत्त्यावर बाल आधार कार्ड पाठवेल जाईल.