scorecardresearch

Premium

UK Global Investors Summit 2023 : बाबा रामदेव १० हजार कोटींची गुंतवणूक करणार, हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होणार

बाबा रामदेव शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समीट २०२३ मध्ये सहभागी झाले होते. ही शिखर परिषद आज ८ डिसेंबरपासून सुरू झाली असून, ९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

baba ramdev
(फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव येत्या काही दिवसांत १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. विकसित भारत निर्माण करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले की, प्रस्तावित गुंतवणुकीमुळे हजारो लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

या उद्योगपतींनी समीटला हजेरी लावली

बाबा रामदेव शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समीट २०२३ मध्ये सहभागी झाले होते. ही शिखर परिषद आज ८ डिसेंबरपासून सुरू झाली असून, ९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अदाणी समूहाचे संचालक आणि कृषी आणि तेल आणि वायू व्यवसायाचे प्रमुख प्रणव अदाणी, JSW MD सज्जन जिंदाल, ITC MD संजीव पुरी, Emaar India CEO कल्याण चक्रवर्ती, TVS सप्लाय चेन सोल्युशन्सचे अध्यक्ष आर. दिनेश आदी नेते उपस्थित होते.

Railway Station Development Program by Prime Minister Narendra Modi Ceremonial Foundation cornerstone in Sanskrit
संस्कृतमध्ये पायाभरणी समारंभाची कोनशिला? पंतप्रधान मोदींच्या हस्ते रेल्वे स्थानक विकास कार्यक्रम…
Resident doctors strike continues Mard insists on strike despite Deputy Chief Minister Ajit Pawars appeal
निवासी डॉक्टरांचा संप सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतरही ‘मार्ड’ संपावर ठाम
wardha prakash ambedkar rally marathi news, wardha 18 th february rally, prakash ambedkar latest news in marathi
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सभा १८ फेब्रुवारीलाच का ? जाणून घ्या या दिवसाचे ऐतिहासिक महत्व
April-December Fiscal Deficit announced by nirmala sitharaman
वित्तीय तूट डिसेंबरअखेर वार्षिक अंदाजाच्या ५५ टक्क्यांवर; नऊ महिन्यांत ९.८२ लाख कोटींच्या पातळीवर

हेही वाचाः मोदी सरकारचा मोठा निर्णय, कांद्याच्या निर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत घातली बंदी

बाबा रामदेव यांचे गुंतवणूकदारांना आवाहन

कार्यक्रमादरम्यान बाबा रामदेव यांनी आपल्या भाषणात पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या व्हिजनचा उल्लेख केला. त्यांनी सर्व गुंतवणूकदारांना भारताचा विकास करण्याचा आणि देशाला जागतिक आर्थिक शक्तिस्थान बनवण्याचा पंतप्रधानांचा संकल्प बळकट करण्याचे आवाहन केले. बाबा रामदेव यांनी देशाला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा उल्लेख केला आणि या दिशेने पतंजलीच्या योगदानाची चर्चा केली.

हेही वाचाः RBI ने रुग्णालय अन् शिक्षण संस्थांसाठी UPI व्यवहार मर्यादा वाढवली, आता ५ लाखांपर्यंत पेमेंट करता येणार

१० हजारांहून अधिक लोकांना रोजगार

बाबा रामदेव म्हणाले की, पतंजली गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीमध्ये आपल्या बाजूने योगदान देत आहे. पतंजलीकडून १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी परिषदेत पंतप्रधानांना दिले. या गुंतवणुकीमुळे आगामी काळात १० हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. नवीन भारत निर्माण करण्याच्या पंतप्रधानांच्या प्रबळ इच्छाशक्तीचे बाबा रामदेव यांनी कौतुक केले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना त्यांनी कॉर्पोरेट घराण्यांना उत्तराखंडमध्ये युनिट्स स्थापन करण्याचे आवाहनही केले.

या उद्योगपतींनी घोषणाही केल्या

परिषदेदरम्यान सज्जन जिंदाल यांनी राज्यात १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. धार्मिक स्थळांची जोडणी सुधारण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. दरम्यान, TVS सप्लाय चेनचे आर दिनेश यांनी राज्यातील विद्यमान प्लांटच्या विस्ताराची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, त्यांची कंपनी राज्यात गुंतवणूक वाढवेल, ज्यामुळे ७ हजारांहून अधिक रोजगार निर्माण होतील. राज्यातील पहिले विशेष बहु-कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याबाबतही त्यांनी माहिती दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Baba ramdev will invest 10 thousand crores thousands of employment opportunities will be created vrd

First published on: 08-12-2023 at 17:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×