लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : आघाडीची दुचाकी कंपनी असलेल्या बजाज ऑटो समभाग पुर्नखरेदी (बायबॅक) करण्याची योजना आखत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या ८ जानेवारीच्या नियोजित बैठकीत समभाग पुनर्खरेदीचा प्रस्ताव चर्चेला घेतला जाणार आहे. कंपनीने समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजना आखत असल्याचे जाहीर केल्यानंतर बजाज ऑटोचा समभाग ४.८२ टक्क्यांनी म्हणजेच ३२१.४५ रुपयांनी वधारून ६,९८६.५० रुपयांवर बंद झाला. समभागाने बुधवारच्या सत्रात ७,०५९.८५ ही ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली.

समभाग पुर्नखरेदी हा भागधारकांना भांडवल परत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. ज्यावेळी पुस्तकांवरील रोख रक्कम १५,००० कोटींच्या पुढे जाते तेव्हा आम्ही गुंतवणूकदारांना परत देण्याचा प्रयत्न करतो, असे बजाज ऑटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बजाज म्हणाले. बजाज ऑटोनेनवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्या व्यवसायाची पुनर्रचना केली.

आणखी वाचा-पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार? खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी केलं स्पष्ट

बजाज ऑटोने अलीकडेच डिसेंबर २०२३ मध्ये एकूण विक्रीत १६ टक्क्यांनी वाढ नोंदवून ३.२६ लाख दुचाकींची विक्री केली. तर या कालावधीत २.८३ लाख दुचाकींची विक्री केली. जी गेल्यावर्षी याच कालावधीत २.४७ लाख राहिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणजे काय?

एखादी कंपनी तिच्या विद्यमान भागधारकांकडून एका निर्धारित किमतीला कंपनीचे समभाग खरेदी करते यालाच समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणतात. कंपनीकडून बाजारभावापेक्षा अधिक किमतीने गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी केले जातात. प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) अगदी विरुद्ध अशी ही प्रक्रिया आहे.