नवी दिल्ली : सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षात सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील आंशिक भागभांडवल विकून १६,५०७ कोटी रुपये कमावले आहेत, जे निर्धारित उद्दिष्ट आणि सुधारित अंदाजापेक्षा खूप कमी आहे. ऐतिहासिकदृष्ट्या २०१८-१९ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षांचा अपवाद केल्यास, अर्थसंकल्पात निर्धारित केलेल्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य सरकारला कायम हुलकावणी देत आले आहे.

सरलेल्या २०२३-२४ आर्थिक वर्षात ३१ मार्चअखेर, सरकारने १० केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतील भागभांडवलाची खुल्या बाजारात ‘ऑफर फॉर सेल’माध्यमातून विक्री केली. ज्यापैकी कोल इंडियामधील हिस्सा विक्रीतून ४,१८६ कोटी रुपये, तर एनएचपीसी आणि एनएलसी इंडियामधील हिस्सा विक्रीतून अनुक्रमे २,४८८ कोटी आणि २,१२९ कोटी रुपये मिळाले. इरेडाच्या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीतून सरकारने ८५८ कोटी रुपये उभे केले. सरकारने आरव्हीएनएल, एसजेव्हीएन, इरकॉन इंटरनॅशनल, हुडकोमधील भागभांडवल विकले आणि एसयूयूटीआयकडून सरकारने पैसा मिळवला.

हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government raises rs 16507 crore via public sector enterprises disinvestment in fy 24 print eco news zws
First published on: 01-04-2024 at 23:57 IST