मुंबईः देशातील पंख्यांच्या बाजारातील अग्रणी क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने ऊर्जा कार्यक्षमतेप्रति कटिबद्धता दृढ करताना, तिची संपूर्ण छतावरील पंख्यांची (सिलिंग फॅन) श्रेणी वीज बचत करणाऱ्या तारांकित कंपन्यांमध्ये बदलत असल्याचे परिवर्तन अंगीकारल्याची घोषणा केली. या श्रेणीतून विक्री वृद्धीत १५ टक्के योगदान मिळविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा >>> ‘पीएनबी’कडून ५ लाखांपासून पुढील धनादेशांसाठी ‘पीपीएस’ बंधनकारक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सीच्या (बीईई) सुधारित वीज कार्यक्षमतेच्या नियमांतर्गत छतावरील पंख्यांचा समावेश करून, या उत्पादनानाही विजेच्या वापराशी संलग्न तारांकित मानांकन बंधनकारक केले गेले आहे. १ मार्च २०२३ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे पंख्यांच्या किमती जरी वाढल्या असल्या, तरी विजेवरील खर्चात त्यामुळे होणारी बचत पाहता दीर्घकालीन फायदा मोठा आहे आणि त्या संबंधाने ग्राहकांच्या प्रबोधनाची मोहीम कंपनीने हाती घेतली आहे, असे क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू जॉब यांनी सांगितले. ग्राहकांनी बिगर-तारांकित पंख्याच्या बदल्यात, एक तारा मानांकन असलेल्या पंख्याचा वापर सुरू केल्यास, त्याची किंमत म्हणून अतिरिक्त १५० रुपये ग्राहकाला एकदाच मोजावे लागतील, परंतु त्यातून त्याच्या विजेवरील खर्चात दरवर्षी ८५० रुपयांची बचत होईल. त्यामुळे पंख्याच्या खरेदीची किमत ग्राहकाला केवळ दोन महिन्यांमध्ये परत मिळू शकेल, असे जॉब यांनी सांगितले.