न्यूयॉर्क : आभासी चलनांचा लोकप्रिय व्यवहारमंच ‘एफटीएक्स’च्या पतनानंतर वेगाने साम्राज्य ढासळत गेलेला क्रिप्टोसम्राट सॅम बँकमन-फ्राइडला मोठ्या फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी गुरुवारी २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.सरलेल्या नोव्हेंबरमध्ये फसवणूक आणि कट रचल्याबद्दल ३२ वर्षीय बँकमन-फ्राइडला दोषी ठरवण्यात आले होते. यशाच्या अत्युच्च शिखरावरून नाट्यमय घसरण होत अकस्मात रावाचा रंक झाल्याची ही कथा आहे. जगातील ३० वर्षांखालील सर्वात श्रीमंत व्यक्तीत स्थान असलेल्या बँकमन-फ्राईडने २०१९ मध्ये ‘एफटीएक्स’ या अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या क्रिप्टो एक्स्चेंजची स्थापना केली आणि तोच त्याच्या पतनासही जबाबदार ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एफटीएक्स एक्स्चेंज दिवाळखोर होण्यामागे गैरव्यवहारांची मालिका आहे. ग्राहक, गुंतवणूकदार आणि बँकांचे सुमारे १० अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ८३,००० कोटी रुपये एक्स्चेंजमधून गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. एक्स्चेंजचे संस्थापक असलेल्या बँकमन-फ्राइडने कोणाचीही परवानगी न घेता, गोपनीयरित्या ही रक्कम त्याचीच दुसरी कंपनी असलेल्या अल्मेडा रिसर्चकडे वळती केली. यामध्ये त्याला कंपनीतील काही अधिकाऱ्यांनीही मदत केली. एफटीएक्स एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी बँकमन-फ्राईड याच्यासह नऊ विशेष सहकाऱ्यांचा यात समावेश  होता.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 28 March 2024: सोनं खरेदी करणाऱ्यांना पुन्हा झटका, दरात पुन्हा वाढ, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत किती?

जिल्हा न्यायाधीश लुईस ए. कॅप्लान यांनी त्याच मॅनहॅटन न्यायकक्षामध्ये शिक्षा ठोठावणारा आदेश दिला, जेथे चार महिन्यांपूर्वी बँकमन-फ्राइड यांनी साक्ष देताना म्हटले होते की, त्याचा हेतू चोरी न करता, त्याच्या नाविन्यपूर्ण आणि परोपकारी कल्पनांनी उदयोन्मुख क्रिप्टो बाजारपेठेत क्रांती घडवून आणावी असा होता. एफटीएक्सचा पैसा कॅरिबियनमध्ये आलिशान मालमत्ता, खासगी विमाने आणि चिनी अधिकारी व इतरांना लाच देण्यासाठी वापरल्याचा त्याच्यावरील आरोपही सिद्ध झाला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crypto emperor sam bankman fried sentenced to 25 years in prison print eco news amy
First published on: 29-03-2024 at 07:17 IST