scorecardresearch

Premium

‘स्पॉटीफाय’कडून दीड हजार कर्मचाऱ्यांची कपात

संगीतप्रेमींसाठी त्यांच्या पसंतीच्या संगीताचे वहन सेवा देणाऱ्या स्पॉटीफाय या कंपनीने जागतिक मनुष्यबळात १७ टक्के कपात करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला.

employees Spotify
‘स्पॉटीफाय’कडून दीड हजार कर्मचाऱ्यांची कपात (image credit – pixabay)

पीटीआय, लंडन

संगीतप्रेमींसाठी त्यांच्या पसंतीच्या संगीताचे वहन सेवा देणाऱ्या स्पॉटीफाय या कंपनीने जागतिक मनुष्यबळात १७ टक्के कपात करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. कंपनीची ही कर्मचारी कपातीची तिसरी फेरी असून, खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

ministry of women and child development internship program marathi news, two months internship program for woman marathi news
शासकीय योजना : स्वावलंबी भारतासाठी इंटर्न व्हा
Uddhav thackeray on farmer protest
“शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची सरकारची तयारी, इतका जोश चीनच्या सीमेवर दाखवला तर…”, ठाकरे गटाचा संताप
women tehsildars car chased by bikers in jalgaon
चित्रपटाप्रमाणे थरार… जेव्हा महिला तहसीलदारांच्या वाहनाचा दुचाकीस्वारांकडून पाठलाग होतो
Fraud of 90 lakh by giving lure of good returns on investment
मुंबई : गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

स्पॉटीफायचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनिएल एक यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना संदेश पाठविला आहे. कंपनीची पुनर्रचना करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही कपात करण्यात येत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नेमकी किती कर्मचाऱ्यांची कपात करणार हे त्यांनी जाहीर केले नाही. मात्र, कंपनीच्या प्रवक्त्याने १७ टक्के म्हणजेच दीड हजार कर्मचाऱ्यांना कमी केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – ठाणे : घोडबंदर, माजिवडा प्रवास नकोसा

हेही वाचा – ठाणे : अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यंदा वाशीत, ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत आयोजन

स्पॉटीफायने यंदा सप्टेंबरपर्यंतच्या नऊ महिन्यांत ५० कोटी डॉलरचा तोटा नोंदविला आहे. कंपनीने जानेवारी महिन्यात तिचे सहा टक्के मनुष्यबळ कमी केले होते. त्यानंतर जून महिन्यात आणखी दोन टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले होते. आता मनुष्यबळ कपातीची तिसरी फेरी कंपनीकडून सुरू आहे, त्यात तब्बल १७ टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. ॲमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि आयबीएम यासारख्या महाकाय तंत्रज्ञान कंपन्यांनी यावर्षी लाखो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Decision to remove one and a half thousand employees from spotify ssb

First published on: 05-12-2023 at 10:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×