खासगी क्षेत्रातील HDFC बँकेने काही निवडक कालावधीसाठी MCLR दर १० बेसिस पॉईंटने वाढवला आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवे दर ७ ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाले आहेत.

HDFC बँकेच्या कर्जाच्या व्याजदरात बदल

HDFC बँकेने ओव्हरनाइट MCLR दर ८.६० टक्के केला आहे. एक महिन्याचा MCLR ८.६५ टक्के करण्यात आला आहे. तीन महिन्यांचा MCLR ८.८५ टक्के आणि सहा महिन्यांचा MCLR ९.१० टक्के करण्यात आला आहे. एक वर्षाचा MCLR जो अनेक ग्राहकांच्या गृहकर्जाशी जोडलेला आहे. आता तो ९.२० टक्के झाला आहे. तसेच दोन वर्षांसाठी MCLR ९.२० टक्के आहे. तीन वर्षांसाठी MCLR ९.२५ टक्के झाला आहे.

हेही वाचाः इस्रायलमध्ये अडकले TCS चे काही कर्मचारी, कंपनीकडून कर्मचार्‍यांच्या सुरक्षेवर बारकाईने नजर

MCLR म्हणजे काय?

MCLR हा किमान दर आहे ज्यावर बँका त्यांच्या ग्राहकांना कर्ज देतात. या आधारे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि कार कर्जाचे व्याजदर काय असतील हे ठरविले जातात.

हेही वाचाः Unemployment Rate : खेड्यांऐवजी शहरांत लोकांना मोठ्या प्रमाणात मिळतोय रोजगार, जून तिमाहीच्या आकडेवारीतून खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एचडीएफसी बँकेने एफडीवरील व्याज कमी केले

HDFC बँकेने काही निवडक कालावधीच्या FD वरील व्याजदर कमी केले आहेत. बँक सामान्य नागरिकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या एफडीवर ३ टक्के ते ७.२० टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ३.५ टक्के ते ७.७५ टक्के व्याज दिले जात आहे. RBI ने नवे आर्थिक धोरण जाहीर केले आहे. यामध्ये रेपो दर कायम ठेवण्यात आला होता.