नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १. ६५ कोटी सदस्यांची भर पडली आहे. गेल्या आर्थिक वर्षात सदस्यसंख्येत १९ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

कामगार मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार, गेल्या साडेसहा वर्षांत ६.१ कोटी नवीन सदस्य ईपीएफओत दाखल झाले आहेत. ‘ईपीएफओ’च्या सदस्यसंख्येत वर्ष २०१८-१९ मध्ये ६१.१२ लाखांची भर पडली होती. त्यानंतर वर्ष २०१९-२० मध्ये ही वाढ ७८.५८ लाख होती. मात्र, वर्ष २०२०-२१ मध्ये सदस्यसंख्येत ७७.८ लाखांची घट झाली. याला करोना संकट कारणीभूत होते. नंतर परिस्थिती सुधारून सदस्यसंख्येत वर्ष २०२१-२२ मध्ये १.२२ कोटी आणि वर्ष २०२२-२३ मध्ये १.३८ कोटींची भर पडली.

हेही वाचा >>> जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल! सरलेल्या आर्थिक वर्षात तिजोरीत ३.२ लाख कोटींची भर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ईपीएफओ’च्या सदस्यसंख्येत झालेली वाढ ही रोजगार बाजारपेठेतील संघटितपणात झालेली वाढ दर्शविणारी आहे. याचबरोबर संघटित क्षेत्रातील मनुष्यबळाला सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळणाऱ्यांची संख्याही यामुळे वाढत आहे. देशातील रोजगाराच्या स्थितीत सुधारणा झाल्याचे ‘ईपीएफओ’च्या सदस्यसंख्येतील वाढीमुळे समोर आले आहे.