एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने सर्व सदस्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. EPFO ​​कधीही फोन, ई-मेल आणि सोशल मीडियाद्वारे कोणत्याही सदस्याची वैयक्तिक माहिती विचारत नाही. या सर्व माध्यमांतून कधीही कोणाशीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका, असा सल्ला ईपीएफओनं दिला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केली

ईपीएफओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट ट्विटर (X) वर पोस्ट केले. ईपीएफओ लिहिते की, बनावट कॉल आणि मेसेजपासून सावध राहा. ईपीएफओ कधीही फोन, ई-मेल आणि सोशल मीडियाद्वारे सदस्यांकडून कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाही.

याबरोबरच ईपीएफओने सोशल मीडियावर एक पोस्टरही शेअर केले आहे, ज्यामध्ये ‘सावध राहा, सावध राहा’, तुमचा UAN/पासवर्ड/PAN/आधार/बँक खात्याचा तपशील/OTP किंवा आर्थिक तपशील, इतर कोणतेही वैयक्तिक किंवा इतर कोणत्याही गोष्टी कधीही शेअर करू नका, असे लिहिले होते. तसेच ती माहिती कोणाबरोबरही शेअर करू नका. ईपीएफओ किंवा त्याचे कर्मचारी कधीही मेसेज, फोन, ई-मेल, व्हॉट्सअॅप, सोशल मीडियावर हे तपशील विचारत नाहीत.

हेही वाचाः वेदांताच्या विभाजनानं काय फरक पडणार? कंपनीचे नशीब बदलेल का?

सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल करा

ईपीएफओने पोस्टरमध्ये म्हटले आहे की, अशी माहिती विचारणाऱ्या बनावट कॉल्स/मेसेजपासून सावध राहा आणि जर कोणी तुम्हाला अशी माहिती विचारली तर लगेच पोलीस/सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करा.

हेही वाचाः सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन १० टक्क्यांनी वाढले, चालू आर्थिक वर्षात चौथ्यांदा १.६२ लाख कोटी रुपये केले पार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

EPFO हेल्पलाइनशी संपर्क साधा

तसेच FPFO च्या PF, पेन्शन किंवा EDLI योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही EPFO ​​हेल्पलाइन १४४७० वर कॉल करू शकता. ही हेल्पलाइन सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असते. इंग्रजी व्यतिरिक्त तुम्हाला हिंदी, गुजराती, मराठी, कन्नड, तमीळ, तेलुगू, बंगाली आणि आसामी भाषेतही माहिती मिळू शकते.