आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीचा कायापालट करण्याची तयारी उद्योगपती गौतम अदाणी यांनी सुरू केली आहे. काही काळापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या कंपनी समूहाकडे धारावी पुनर्विकास प्रकल्पाची धुरा सोपवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांची कंपनी धारावीचा पुनर्विकास सुरू करू शकते, ज्यामुळे सुमारे १० लाख लोकांचे जीवन कायमचे बदलणार आहे. खरं तर गौतम अदाणी यांची कंपनी फेब्रुवारीपासून धारावीतील लोकांचा बायोमेट्रिक डेटा गोळा करण्यास सुरुवात करणार आहे. पुनर्विकासानंतर कोणाला मोफत घर दिले जाईल आणि कोणाला नाही हे ठरवण्यासाठी या बायोमेट्रिक सर्वेक्षणाची गरज आहे. मात्र, हे काम खूप अवघड जाणार आहे, कारण अनेक दशकांपासून अनेक सरकारे लोकांचा विश्वास जिंकून या भागाचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचाः हिंडेनबर्गच्या आरोपांची वर्षपूर्ती; अदाणी समूहाचे खुले पत्र, म्हणाले…

धारावी परिसर ६०० एकरांवर पसरलेला

धारावी झोपडपट्टी सुमारे ६०० एकरमध्ये पसरलेली आहे. पूर्वी हा परिसर शहराबाहेर असायचा, पण कालांतराने मुंबई शहराचा परिघ बदलला आणि धारावी शहराच्या मध्यभागी आले. आज त्याच्या एका टोकाला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्ससारखे जागतिक दर्जाचे बिझनेस हब आहे. दुसरीकडे दादर, माहीमसारख्या जुन्या वस्त्या आहेत. त्यामुळे त्याच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदाणी समूहाने घेतली आहे.

हेही वाचाः Ayodhya Ram Mandir : अयोध्येत धार्मिक पर्यटन वाढल्याने २ लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता, दरवर्षी ५ कोटी पर्यटक येणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुन्या घराच्या बदल्यात ‘या’ लोकांना मोफत घर मिळेल

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नियमांनुसार जे लोक धारावी परिसरात सन २००० पूर्वीपासून राहत आहेत. त्या लोकांना जुन्या घराच्या बदल्यात मोफत घर मिळेल. या भागाचे शेवटचे सर्वेक्षण सुमारे १५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. अंदाजानुसार, येथे राहणाऱ्या लोकांची संख्या सुमारे ७ लाख होती. यावेळी डेटा गोळा करण्यासाठी अदाणी ग्रुपची टीम लोकांच्या घरी जाऊन माहिती गोळा करणार आहे. ते धारावीत राहतात की काम करतात, असा प्रश्नही लोकांना विचारला जाणार आहे. त्यांच्या मालकीची कागदपत्रे आणि बायोमेट्रिक माहिती गोळा केली जाणार आहे. ईटीच्या म्हणण्यानुसार, डेटा संकलनानंतर एक वर्षाच्या आत परिसराचा पुनर्विकास सुरू होणार आहे.