पीटीआय, नवी दिल्ली

मागणीतील सुधारलेली परिस्थिती, नवीन ग्राहकांची वाढती संख्या आणि परिणामी रोजगारातही जलद वाढ नोंदविणाऱ्या सेवा क्षेत्रातील वाढ सरलेल्या मे महिन्यांत स्थिर राहिली, असे बुधवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणाने स्पष्ट केले. भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक मे महिन्यात किंचित वाढीसह ५८.८ गुणांवर नोंदला गेला. एप्रिलमध्ये हा गुणांक ५८.७ गुणांवर होता. उल्लेखनीय म्हणजे सेवा क्षेत्राचा निर्देशांक त्याच्या दीर्घकालीन सरासरी ५४.२ पेक्षा अधिक राहिला. कार्यादेशातील सकारात्मक वाढीला मे महिन्यात सेवा क्षेत्राने अनुभवले. सेवा क्षेत्राचा निर्देशांक ५० गुणांवर नोंदला गेल्यास विस्तार तर ५० गुणांखाली नोंदला गेल्यास आकुंचन झाल्याचे मानले जाते.

एप्रिलपासून नवीन निर्यात व्यवसायात वाढ झाली आहे. शिवाय मजबूत आंतरराष्ट्रीय मागणीने सेवा क्रियाकलापांना चालना दिली. सर्वेक्षणानुसार, जाहिराती, मागणीत सातत्य आणि विद्यमान ग्राहकांकडून वारंवार येणाऱ्या कार्यादेशामुळे सेवा क्षेत्राची सक्रियता वाढली, असे एचएसबीसीचे मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले. मे महिन्यात कंपन्यांनी त्यांच्या सेवांच्या आंतरराष्ट्रीय मागणीत विक्रमी सुधारणा नोंदवली. विशेषतः आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेतून मिळणाऱ्या निर्यात कार्यादेशात जलद वाढ नोंदवली गेली.

वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, भारतातील सेवा प्रदात्यांनी कर्मचारी भरतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. नोकऱ्यांच्या निर्मितीचा एकूण दर सर्वेक्षणाच्या इतिहासातील सर्वात मजबूत राहिला. कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ, अतिरिक्त कामाच्या तासांचे वेतन (ओव्हरटाइम पेमेंट), यामुळे कंपन्यांच्या खर्चात भर पडली आहे. काही कंपन्यांनी स्वयंपाकाचे तेल, साहित्य आणि मांसाहारावरील वाढलेल्या खर्चाचा उल्लेख देखील केला. दरम्यान, सेवा निर्मितीचा वाढत्या खर्चामुळे सेवा मूल्याच्या वाढीची शक्यता व्यक्त केली आहे. मे महिन्यात व्यवसायाच्या भावनांमध्ये सुधारणा झाली आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढणे, ग्राहकांची संख्या वाढणे आणि वितरण उपक्रमांमुळे पुढील वर्षात क्रियाकलाप वाढीस मदत होईल.

संयुक्त निर्देशांकात घसरण

दरम्यान, देशातील निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा एचएसबीसी इंडियाचा संयुक्त पीएमआय निर्देशांक मे महिन्यात ५९.३ गुणांवर नोंदविला गेला. एप्रिलच्या तुलनेत त्यात किरकोळ किंचित घसरण झाली आहे. एप्रिल महिन्यात तो ५९.७ गुणांवर होता. कारखाना उत्पादनातील वाढीचा वेग मंदावला आहे तर सेवा क्रियाकलाप जलद गतीने वाढले आहेत. भारतीय वस्तू आणि सेवांच्या मागणीत सुरू असलेल्या सुधारणांमुळे दोन्ही क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांमध्ये विक्रमी वाढ झाली. म्हणूनच, एकूण रोजगार अभूतपूर्व वेगाने वाढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेवा पीएमआय म्हणजे काय?

सेवा पीएमआय (खरेदी व्यवस्थापक निर्देशांक) हा एक निर्देशक आहे, जो सेवा क्षेत्राच्या कामगिरी आणि आर्थिक आरोग्याची अंतर्दृष्टी प्रदान करतो. निर्देशांक विक्री, रोजगार पातळी, इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि किंमतींसह सेवा उद्योगातील प्रमुख चलांचा मागोवा ठेवतो. निर्देशांक गुंतवणूकदार, अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांना सध्याच्या व्यवसाय परिस्थिती समजून घेण्यास मदत करतो.