ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन कांत मुंजाल यांच्यावर कारवाई केली आहे. हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे सीएमडी आणि अध्यक्ष पवनकांत मुंजाल यांच्या २४.९५ कोटी रुपयांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. मनी लाँडरींग प्रतिबंधात्मक कायदा २००२ ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर हिरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये घसरण सुरु झाली आहे.

ईडीने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यांनी मेसर्स हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष आणि सीएमडी पीके मुंजाल आणि इतरांविरोधात परकीय चलन बाहेर नेल्याबद्दल महसूल गुप्तचर संचालनालयाने सीमा शुल्क कायदा, १९६२ च्या कलम १३५ अंतर्गत दाखल केलेल्या FIR आधारे तपास सुरु केला होता असंही म्हटलं आहे.

तीन महिन्यांपूर्वी, ईडीने पीएमएलए अंतर्गत पवन मुंजाल यांच्या दिल्ली आणि गुरुग्राममधील कार्यालयांवर आणि घरांवर छापे टाकले होते. ईडीच्या छाप्यानंतर, हिरो मोटोकॉर्पने एक निवेदन जारी करून पवन मुंजाल यांच्या दिल्ली आणि गुरुग्राम कार्यालयात छापे टाकल्याची माहिती दिली होती. हिरो मोटोकॉर्पने म्हटले होते की, ईडीचे अधिकारी दिल्ली आणि गुरुग्राममधील आमच्या दोन कार्यालयांमध्ये आणि आमच्या अध्यक्षांच्या घरी पोहोचले होते. कंपनी ईडीला यापुढेही सहकार्य करणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Hero MotoCorp ही जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी ४० पेक्षा जास्त देशांमध्ये व्यवसाय करते. कंपनीकडे जागतिक बेंचमार्क असलेले ८ उत्पादन कारखाने आहेत. त्यापैकी सहा भारतात आहेत.