केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखलं जातं. त्यांचा आक्रमक स्वभाव आणि त्यांची धोरणी वृत्ती यामुळे ते राजकारणातले अनेक डाव यशस्वी करतात. याच अमित शाह यांच्या गुंतवणुकीचा तपशील समोर आला आहे. त्यांच्याकडे १८० पेक्षा जास्त लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स आहेत..

अमित शाह यांनी जे प्रतिज्ञापत्र आणि त्यांच्या गुंतवणुकीचा तपशील सादर केला आहे त्यानुसार त्यांच्याकडे १८० हून अधिक लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स आहेत. या शेअर्सची किंमत १५ एप्रिल २०२४ ची किंमत १७ कोटींहून अधिक आहे. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शाह निवडणूक लढवत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली सगळी माहिती दिली आहे.

अमित शाह आणि त्यांच्या पत्नीकडे २६१ लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स

अमित शाह यांच्याकडे मोठमोठ्या लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स आहेत. ज्यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, एमआरएफ, कोलगेट-पामोलिव, प्रॉक्टर अँड गँबल, एबीबी अशा नामांकित कंपन्यांचे शेअर्स अमित शाह यांच्याकडे आहेत. अमित शाह यांच्याकडे १७.४४ कोटी बाजारमूल्य असलेले १८१ लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स आहेत. तर त्यांच्या पत्नी सोनल शाह यांच्याकडे ८० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स आहेत ज्यांचं बाजारमूल्य २० कोटी रुपये आहे. दोघांचे मिळून २६१ लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स आहेत. ज्यांचं बाजारमूल्य ३७ कोटी रुपये आहे.

हे पण वाचा- काल राडा, आज सभा: अमित शाहांच्या प्रचारसभेआधीच नवनीत राणा-बच्चू कडू यांच्यात शाब्दिक चकमक!

सोनल शाह यांच्याकडे कॅनरा बँकेचे ५० हजार शेअर्स आहेत ज्यांचं बाजारमूल्य २.९६ कोटी आहे. अमित शाह यांच्याकडे या बँकेचे ७.२५ लाख रुपयांचे शेअर्स आहेत.

प्रॉक्टर अँड गँबलचे या दोघांकडे मिळून १.९ कोटींचे शेअर्स आहेत.

करुर वैश्य बँकेचे १ लाख शेअर्स सोनल शाह यांच्याकडे आहेत. ज्याचं बाजारमूल्य १.९ कोटी रुपये आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित शाह यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यानुसार त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे ६५ कोटींची मालमत्ता आहे.