दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठीही २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानिमित्ताने आज नवनीत राणा यांच्यासाठी अमित शाह अमरावतीत येणार असून बच्चू कडू यांचीही आज सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे कोणाच्या सभेला सर्वाधिक गर्दी होतेय, हे पाहावं लागणार आहे.

प्रचाराच्‍या अखेरच्‍या टप्‍प्‍यात येथील सायन्‍सकोर मैदानाच्‍या आरक्षणावरून भाजप आणि प्रहार यांच्‍यात झालेल्‍या संघर्षाआधी राणा दाम्‍पत्‍याशी त्‍यांचे अनेकवेळा खटके उडाले होते. राणा दाम्‍पत्‍य आणि बच्‍चू कडू हे एकमेकांवर टीकेची संधी सोडत नाहीत. पण, मंगळवारी सायन्‍सकोर मैदानावर घडलेल्‍या नाट्याने ही लढाई टोकदार केली आहे. आधी सायन्‍सकोर मैदान प्रहारच्‍या सभेसाठी आरक्षित केले जाते, त्‍यानंतर सुरक्षेचे कारण देऊन ते नाकारले जाते. यात प्रशासनाची भूमिका नैसर्गिक न्‍यायाची नाही, हे घसा दुखेपर्यंत ओरडून सांगूनही बच्‍चू कडू यांना माघार घ्‍यावी लागली. पण, त्‍यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपविरोधी प्रचाराची आयती संधी त्‍यांना मिळाली आहे. दुसरीकडे, या प्रकरणातून सहानुभूती मिळवण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न राहणार आहे.

khanapur vidhan sabha
सांगली, जत, खानापूरमध्ये बंडखोरी; अन्यत्र आघाडी – महायुती लढत
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
Gopal Shetty Take back From Election
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी, बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
gadchiroli vidhan sabha election 2024
गडचिरोलीत आत्राम, गेडाम, मडावी बंडखोरीवर ठाम, होळी, कोवासे, कोवे माघार घेण्याची शक्यता?
Vidhan Sabha election 2024, Arvi Constituency,
बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर, आर्वीत विद्यमान आमदार घेणार माघार

राणांची दडपशाही मोडून काढणार – बच्चू कडू

आज टीव्ही ९ मराठीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “२० हजार लोक तिथे पोहोचले आहेत. २०-३० हजार लोक येत आहेत. ही शेतकऱ्यांची लढाई असून आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. प्रचंड उत्साह आहे. राणांची दडपशाही आम्ही मोडून काढणार आहोत. त्यांनी कायदा हाती घेतला आहे. अमित शाहांपेक्षा शेतकऱ्यांच्या सभेला सर्वाधिक गर्दी होईल.”

हेही वाचा >> महायुतीतील बच्‍चू कडूंचे राजकीय भवितव्‍य पणाला!

मला हरवण्यासाठी देशातील लोकांना यावं लागतंय – नवनीत राणा

“देशाचे गृहमंत्री अंबानगरीत संबोधन करण्यासाठी येणार आहेत. देशातील भविष्यातील योजनांविषयी ते माहिती देणार आहेत. एक मोठा नेता येत असेल तर त्यांचा मानसन्मान केला पाहिजे. सायन्सकोर मैदानासाठी आम्ही अर्ज केला होता. त्यानुसारच आम्ही परवानगी मागितली होती. आपल्या क्षेत्रात जर कोण मोठा नेता येत असेल तर मॅच्युरिटी दाखवली पाहिजे. मला अभिमान वाटतो की पाच वर्षे ज्या पद्धतीने काम केलं, गोर गरिबांची मदत केली. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील लोकांना नवनीत राणाला पराभूत करण्यासाठी अमरावतीत यावं लागत आहे”, असं नवनीत राणा म्हणाल्या.