Honda : दुचाकी मोटरसायकलच्या निर्मितीतलं जगभरातलं प्रसिद्ध नाव म्हणजे होंडा ( Honda ). मूळच्या जपान येथील असलेल्या होंडा मोटर्सने एक महत्वकांक्षी प्रकल्प आणण्याचं उद्दीष्ट समोर ठेवलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असताना आणि सरकारनेही त्यावर भर दिलेला असताना आता होंडा कंपनीनेही ईव्ही अर्थात इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात २०२८ पर्यंत ही कंपनी सुरु होईल असं होंडा ( Honda ) कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

होंडा कंंपनीने भारतात इव्ही बाईकची फॅक्टरी सुरु करण्याचा घेतला निर्णय

जपानच्या होंडा या कंपनीने २०२८ पर्यंत भारतात इलेक्ट्रिक बाईकची फॅक्टरी सुरु करण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मोटरसायकल आणि पॉवर इलेक्ट्रिफिकेशन बिझनेस युनिटचे प्रमुख डाइकी मिहारा यांनी ही माहिती मंगळवारी दिली. ही फॅक्टरी बंगळुरुच्या बाहेर असलेल्या नरसापुरा येथील ठिकाणी सुरु असलेल्या फॅक्टरीपेक्षा वेगळी असणार आहे. भारतीय बाजारात लागणाऱ्या टू व्हिलर्स आणि निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिक टू व्हिलर्सच्या निर्मितीचं काम या ठिकाणी चालणार आहे. असं होंडा ( Honda ) तर्फे स्पष्ट करण्यात आलं.

डाइकी मिहारा यांनी काय सांगितलं?

“होंडा ( Honda ) १ हजार सीसी क्षमता असलेली इलेक्ट्रिक बाईक फॅक्टरी सुरु करण्याच्या तयारीत आहे. ही फॅक्टरी भारतात सुरु केली जाईल. निर्यात करण्यासाठी निर्मिल्या जाणाऱ्या इव्ही बाईक्सची निर्मितीही या ठिकाणी होईल. ज्या इव्ही बाईक आम्ही तयार करणार आहोत त्यांच्या बॅटरींची क्षमता चार किलोवॅट असणार आहे. वेगवेगळे मॉडेल्स आम्ही इव्ही बाईक्समध्ये आणू.” असंही सांगण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होंडाच्या इव्ही बाईकची ३० मॉडेल्स आणली जाणार

इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या बाजारात होंडा ( Honda ) कंपनी थोडी उशिरा उतरते आहे. तरीही होंडा पूर्ण तयारीनिशी या बाजारात उतरते आहे यात शंका नाही. तसंच होंडाच्या गाड्यांना एरवीही मोठी मागणी असते. होंडाची इ बाईक जेव्हा येईल तेव्हा त्या बाईक्सच्या विक्रीतही होंडा पहिल्या क्रमांकावर जाईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. डाइकी मिहारांनी सांगितलं की आम्ही अशी इव्ही आणत आहोत ज्यामध्ये फिक्स्ड बॅटरी असलेली मॉडेल्सही असणार आहेत. २०३० पर्यंत जागतिक स्तरावर आम्ही ३० इलेक्ट्रिकल मॉडेल आणू तसंच आमची वार्षिक विक्री ४० लाख वाहनांपर्यंत नेण्याची आमची तयारी आहे असंही कंपनीने स्पष्ट केलं. बिझनेस वर्ल्ड ने यासंदर्भातलं वृत्त दिलंं आहे.